सांगली- सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशीचे निर्देश सहकार आयुक्तांनी कोल्हापूर विभागीय सहनिबंधक यांना दिले आहेत, अशी माहिती तक्रारदार सुनील फराटे यांनी दिली आहे.
भ्रष्टाचार प्रकरणी मध्यवर्ती बँकेच्या चौकशीचे आदेश
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेमध्ये नोकर भरती, बोगस कर्ज वाटप, मालमत्ता खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्वतंत्र भारत पक्षाचे नेते सुनील फराटे यांनी केली होता. याबाबत फराटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र, त्याबाबत फारशी दखल घेतली गेली नाही. त्यामुळे फराटे यांनी नाबार्डकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भ्रष्टाचाराबाबत तक्रार दिली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन नाबार्डकडून सहकार आयुक्त व निबंधक, पुणे यांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे सहकार आयुक्त व निबंधक कार्यालयाकडून कोल्हापुरातील विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाला सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विरोधात असणाऱ्या तक्रारीबाबत सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले. योग्य ती कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीबाबत संबंधितांना कळवावे, असे पत्र पाठवण्यात आल्याची माहिती, तक्रारदार सुनील फराटे यांनी दिली आहे.
चौकशी पत्र मिळाले नाही