सांगली - शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार शेखर माने यांनी सांगली विधानसभा मतदारसंघात आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. सांगली शहरातल्या पूरग्रस्तांना घेऊन त्यांनी या प्रचाराचा शुभारंभ केला. शहरातून पदयात्रा काढत माने यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
शिवसेनेचे बंडखोर उमेदवार शेखर माने यांनी केला प्रचाराचा शुभारंभ; पूरग्रस्तांच्या हस्ते फोडला नारळ - शेखर माने याचा प्रचार शुभारंभ
सांगली विधानसभा मतदासंघात शिवसेनेचे बंडखोर उमेदवार शेखर माने यांनी प्रचाराला सुरुवात केली. भाजपचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांच्यावीरोधात ते निवडणूक लढवत आहेत.
सांगली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे नेते शेखर माने यांनी बंडखोरी केली आहे. भाजपाचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. या ठिकाणी काँग्रेस उमेदवार पृथ्वीराज पाटील, भाजप उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या विरोधात शेखर माने लढत देत आहेत. त्यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ सांगली मधून केला.
शहरातील गणपती मंदिर पासून प्रचाराचा नारळ फोडून त्यांनी आपल्या प्रचाराचा सुरुवात केली. विशेष म्हणजे या प्रचाराचा नारळ सांगली शहरात नुकताच येऊन गेलेल्या महापुरातील पूरग्रस्तांच्या हस्ते केला. त्यानंतर शेखर माने यांनी शहरातल्या प्रमुख मार्गावरून पदयात्रा काढत विजय करण्याचे आवाहन केले. शेखर माने यांना मनसेने पाठिंबा जाहीर केला आहे. सांगली मतदार संघात काँग्रेस आणि भाजपसमोर शेखर माने यांच्यामुळे एक आव्हान उभे झाले आहे.