सांगली -माजी कृषी राज्यमंत्री ( Minister of State ) सदाभाऊ खोत ( Sadabhau Khot ) यांचा ताफा सोलापूरमध्ये एका हॉटेल चालकाकडून अडविल्यानंतर राज्यात एकच चर्चा सुरू झाली आहे. सदाभाऊ खोत यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आल्याने राज्य सरकारने सदाभाऊ खोत यांच्या सुरक्षेत वाढ ( Increased security ) करत त्यांन "वाय" दर्जाची सुरक्षा दिली आहे.
सदाभाऊंना "वाय"दर्जाची सुरक्षा -माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत हे पंचायत राज दौऱ्याच्या निमित्ताने सोलापूर मध्ये आले असताना एका हॉटेल चालकाने बिल दिले नाही, हे कारण देत सदाभाऊ खोत यांचा ताफा अडवला होता. त्याचबरोबर सदाभाऊ खोत हे राज्य सरकारवर वारंवार टीका करत आहेत, यातून खोत यांच्यावर अनेक ठिकाणी विरोधाचे प्रकार घडले आहेत. थेट त्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी देखील विरोधकांनी पोहोचून आंदोलन केल्याचा प्रकार घडला होता. दरम्यान या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने राज्य सरकारने सदाभाऊ खोत यांना "वाय"दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आजपासून त्यांना "वाय" दर्जाची सुरक्षा सुरक्षा पुरवली आहे.