सांगली- पोलीस दलात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक वाहने दाखल झाली आहेत. वाहतूक शाखेच्या सेवेत ही वाहने कार्यरत असणार आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांना नवा लूक मिळणार आहे. शिवाय कामाला गती येणार आहे. पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते या दोन ट्रॅफिक मोबाईल कारचे लोकार्पण करण्यात आले.
सांगली पोलीस दलात स्मार्ट मोबाईल ट्रॅफिक कार दाखल
पोलीस दलात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक वाहने दाखल झाली आहेत.
सांगली पोलीस दलात समावेश झालेल्या आधुनिक वाहनांचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे. सांगलीच्या पुष्पराज चौक याठिकाणी या नव्या वाहनांचे उद्घाटन सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या उपस्थितीत झाले. ही दोन्ही वाहने सांगली आणि मिरज वाहतूक शाखेत कार्यरत असणार आहेत.
या वाहनांमध्ये स्पीड गन, ब्रीद अॅनालेजर तसेच वाहनांच्या काच पातळी तपासणीचे यंत्रणा उपलब्ध आहेत. यामुळे वेगाने वाहने चालवणाऱ्या वाहन धारकाच्या दंडाची पावती घरच्या पत्त्यावर पाठवण्याची सोय आहे. यामुळे वाहतूक पोलीस शाखेच्या कामात आणखी बदल होणार आहे. या डिजिटल वाहनांमुळे वाहतूक पोलिसांना नवा लूकही मिळणार आहे. या नव्या दमाच्या वाहनांच्या लोकार्पण प्रसंगी उपधीक्षक अशोक वीरकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, सांगली वाहतूक शाखेचे अतुल निकम, मिरज वाहतूक शाखेचे संजय क्षीरसागर, उपनिरीक्षक बाळासाहेब माळी यांच्यासह सांगली, मिरज वाहतूक शाखांचे कर्मचारी उपस्थित होते.