सांगली - जत तालुक्यातील मायथळ येथे पिठाच्या चक्कीची साफसफाई करताना पत्नीला शॉक लागला होता. तिला वाचवण्यासाठी गेलेल्या पतीचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव पांडुरंग इराप्पा भुसनुर( वय. ४५) असे आहे. तर जखमी झालेल्या महिलेचे नाव सुरेखा पांडुरंग भुसनूर आहे.
जतमध्ये विजेचा शॉक लागून पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी जखमी - In Jat, the husband died on the spot due to electric shock while the wife was injured
जत तालुक्यातील मायथळ येथे पिठाच्या चक्कीची साफसफाई करताना पत्नीला शॉक लागला होता. तिला वाचवण्यासाठी गेलेल्या पतीचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव पांडुरंग इराप्पा भुसनुर( वय. ४५) असे आहे. तर जखमी झालेल्या महिलेचे नाव सुरेखा पांडुरंग भुसनूर आहे.

हेही वाचा -शरद पवार-अमित शाह यांची भेट झाली तर यात चुकीचं काय : संजय राऊत
अशी घडली घटना
रविवारी होळी सणानिमित्त पांडुरंग भुसनुर यांच्या पत्नी सुरेखा घरातील साफसफाई करत होत्या. दरम्यान त्या पिठाच्या चक्कीची साफसफाई करत असताना अचानक शॉक लागल्याने आरडाओरड केली.आवाज ऐकताच पती पांडुरंग त्या ठिकाणी गेले व पत्नीचा बचाव व्हावा म्हणून विजेची केबल खेचत असताना त्यांनाही विजेचा शॉक लागल्याने जमिनीवर कोसळले.या घटनेत पत्नी सुरेखा जखमी झाल्या. त्यांच्यावर माडग्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद जत पोलिसात झाली आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.
TAGGED:
सांगली -