महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

इस्लामपुरात डॉक्टरांची नातेवाईकांना शिवीगाळ करत दमदाटी; 55 जणांवर गुन्हा दाखल - Dr. Sachin sangarulkar hospital

मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना शिवीगाळ आणि दमदाटी करणाऱ्या पती, पत्नी डॉक्टरसह 55 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली मार्गावरील डॉ. सचिन सांगरुळकर यांच्या हॉस्पिटल मध्ये ही घटना घडली. याबाबत गणेश वसंतराव पाटील (रा. कापूसखेड) यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

हॉस्पिटमध्ये शिवीगाळ
हॉस्पिटमध्ये शिवीगाळ

By

Published : May 7, 2021, 11:25 PM IST

सांगली - मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना शिवीगाळ आणि दमदाटी करणाऱ्या पती, पत्नी डॉक्टरसह 55 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली मार्गावरील डॉ. सचिन सांगरुळकर यांच्या हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली. याबाबत गणेश वसंतराव पाटील (रा. कापूसखेड) यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

गणेश पाटील यांचा भाऊ धोंडीराम वसंतराव पाटील (वय ४२) हा १५ एप्रिलपासून ते २ मेपर्यंत डॉ. सचिन सांगरूळकर यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. २ मे ला आॅक्सिजन कमी झाल्याने धोंडीराम यांचा मृत्यू झाला. त्यानंतर धोंडीराम पाटील यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी, तहसिलदार व पोलीस ठाण्यात लेखी तक्रार नातेवाईकांनी दिली आहे. दरम्यान ७ मे रोजी गणेश पाटील व त्यांचे मित्र रामभाऊ कचरे हे डॉ. सचिन सांगरूळकर यांच्या हॉस्पिटलमध्ये धोंडीराम पाटील यांच्यावर केलेल्या उपचाराची फाईल आणण्यासाठी गेले. दरम्यान तेथे उपस्थित असणारे डॉक्टर सचिन सांगरूळकर, त्यांच्या पत्नी व इतर स्टाफने कोणती फाईल आम्हाला माहित नाही, तुम्हाला जे करायचे ते करा, असे म्हणत गणेश याला शिवीगाळ, दमदाटी केली.

यानंतर गणेश पाटील यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details