सांगली- सर्वांप्रमाणेच सांगली संस्थानच्या गणपतीचे साध्या पद्धतीने विसर्जन झाले आहे. शाही मिरवणुकीने गणेशाचे विसर्जन करण्याची गणपती पंचायतन संस्थानची परंपरा आहे. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परंपरा खंडित होऊन साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत लाडक्या बाप्पांना निरोप देण्यात आला आहे.
शाही मिरवणूकीला फाटा देत साध्या पद्धतीने सांगली संस्थांनच्या बाप्पांना देण्यात आला निरोप - सांगली विसर्जन बातमी
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सवत्र गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होत आहे. त्याचप्रमाणे सांगलीत शाही मिरणुकीसाठी प्रसिद्ध असेलेले पटवर्धन संस्थानच्या गणपती पंचायतन ट्रस्टनेही यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने करत आज ट्रस्टच्या गणेशाचे विसर्जन केले.
विसर्जनसाठी निघालेले गणेशभक्त
मात्र, यंदा कोरोनाच्या संकटामुळे गणपती पंचायतन संस्थांनी मिरवणूक रद्द करत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गणपती बाप्पांचे आगमन झाले होते. पाचव्या दिवशी विजयसिंह राजे पटवर्धन आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हस्ते गणरायाची पूजा करण्यात आली. त्यानंतर गाडीमधून सांगलीच्या कृष्णा नदीच्या काठी असलेल्या सरकारी घाट या ठिकाणी गणपतीचा विसर्जन करण्यात आले आहे.
Last Updated : Aug 26, 2020, 7:48 PM IST