सांगली - कर्नाटकहून जालन्यात अवैधरित्या गुटखा घेऊन जात असताना येलूर फाट्यावर कुरळप पोलिसांनी एका ट्रकवर कारवाई केली आहे. यामध्ये 23 लाख 72 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला असून राजिक खान मन्नाखान पठाण याला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच या संपूर्ण कारवाईत एकूण 43 लाख 72 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभाग अधिक चौकशी करत आहे.
सांगली : बंगळुरु महामार्गावरील येलूर फाट्यावर मोठी कारवाई; 23 लाख 72 हजारांचा गुटखा जप्त - कुरळप पोलीस वृत्त
कर्नाटकहून जालन्यात अवैधरित्या गुटखा घेऊन जात असताना येलूर फाट्यावर कुरळप पोलिसांनी त्यावर कारवाई केली. यामध्ये 23 लाख 72 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांनी ही कारवाई केली. तर राजिक खान मन्नाखान पठाण असे वाहतूक करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. सांगली पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद काटे, पोलीस उपनिरीक्षक अनिता केळकर आणि अन्य कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
ही आतापर्यंतची जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई आहे. तर एका वर्षात कुरळप पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक होणारा जवळपास 70 लाखांचा गुटखा जप्त केला आहे.