सांगली -अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या तलाठ्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न वाळू माफियांकडून झाला. यानंतर सिनेस्टाईल पाठलाग करत महसूल प्रशासनाने वाळू माफिायांचे ४ ट्रक जप्त केले. हा प्रकार मिरज शहरात घडला.
अवैध वाळू वाहतूक रोखणाऱ्या तलाठ्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न, चालत्या गाडीतून मारली उडी - news about illegal sand transportation
सांगलीतील मिरज-कोल्हापूर मार्गावर पहाटेच्या सुमारास अवैध वाळू तस्करी करणाऱ्या वाहनावर मिरज तहसील प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. या वेळी एका ट्रक चालकाने तलाठ्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
![अवैध वाळू वाहतूक रोखणाऱ्या तलाठ्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न, चालत्या गाडीतून मारली उडी illegal-sand-transport-truck-seized-by-tahsil-department](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5896259-1012-5896259-1580381103776.jpg)
सांगलीतील मिरज-कोल्हापूर मार्गावर पहाटेच्या सुमारास अवैध वाळू तस्करी करणाऱ्या वाहनावर मिरज तहसील प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. मिरजेचे प्रांताधिकारी समीर शिंगटे आणि तहसीलदार रणजित देसाई यांनी संयुक्त कारवाई करत वाळू तस्कराच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईत अवैध वाळूचे 3 ट्रक आणि 1 आयशर ट्रक पकडण्यात आले. हे ट्रक जप्त करून मिरज तहसील कार्यालयात घेऊन जाताना एका वाळू ट्रक चालकाने गाडी वळवण्याच्या बहाण्याने गाडी सुसाट पळवली. या गाडीत तलाठी प्रवीण जाधव होते. मात्र, वाळू माफियाने जाधव यांच्यासह ट्रक कोल्हापूर शिरोळच्या दिशेने सुसाट नेला. यानंतर तहसीलदार समीर शिंगटे यांनी वाळू ट्रकचा सिनेस्टाईल चित्तथरारक पाठलाग सुरू केला. गाडीत असणाऱ्या तलाठी जाधव यांनी गाडीचे टायर फुटल्यानंतर ट्रकमधून उडी मारली. यात तलाठी जाधव जखमी झाले. तहसीलदार देसाई यांनी पाठलाग करत ट्रक ताब्यात घेत तलाठी जाधव यांना सुरक्षित ठिकाणी हलवले. या कारवाईत अवैध वाळूचे 3 ट्रक आणि 1 आयशर ट्रक पकडण्यात आले असून तीन्ही ट्रक विना नंबरचे असल्याचे समोर आले. याप्रकरणी अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.