महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगली: वाळू तस्करी रोखणाऱ्या महिला तहसीलदारांवर माफियाचा जीवघेणा हल्ला; दोघांना अटक - Tehsil officer Kalpana Dhavale news

तासगाव शहरानजीकच्या कापूर ओढा याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करून तस्करी करण्यात येत असल्याच्या प्रकार सुरू होता. या माहितीवरून अवैधरित्या सुरू असलेलल्या वाळू चोरीवर कारवाईसाठी गेलेल्या तासगावच्या तहसीलदार कल्पना ढवळे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे.

वाळू तस्करी
वाळू तस्करी

By

Published : Nov 25, 2020, 10:10 PM IST

Updated : Nov 25, 2020, 10:52 PM IST

सांगली - वाळू तस्कराचा मस्तवालपणा समोर आला आहे. वाळू तस्कराने तासगावच्या तहसीलदारांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या अंगावर भरधाव गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रकरणी तासगाव पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. निकेत पाटील व गौरव पाटील अशी आरोपींची नावे आहेत.

तासगाव शहरानजीकच्या कापूर ओढा याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करून तस्करी करण्यात येत असल्याच्या प्रकार सुरू होता. या माहितीवरून अवैधरित्या सुरू असलेलल्या वाळू चोरीवर कारवाईसाठी गेलेल्या तासगावच्या तहसीलदार कल्पना ढवळे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे.

महिला तहसीलदारांवर माफियाचा जीवघेणा हल्ला

हेही वाचा-पुढील आठवड्यात एकत्र चौकशीला बोलवा, ईडी अधिकाऱ्यांना प्रताप सरनाईकांची विनंती

तहसीलदारांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न-

वाळू तस्कर अनिकेत पाटील व गौरव पाटील हे दोघे कापूर ओढ्याच्या पात्रातून वाळू चोरी करत होते. यावेळी ढवळे यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावर अनिकेत पाटील आणि गौरव पाटील या दोघांनी त्या ठिकाणाहून गाडी काढण्याचा प्रयत्न केला. तहसीलदार कल्पना ढवळे यांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला असता अनिकेत पाटील याने भरधाव गाडी ढवळे यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, ढवळे या प्रसंगावधान राखत बाजूला झाल्याने त्यांचे प्राण वाचले. दोघांनीही तेथून गाडीसह पळ काढला. पण तहसीलदार यांनी पाठलाग सुरू ठेवल्याने पकडले जाण्याच्या भीतीने अनिकेत पाटील याने सांगली रोडवर गाडी सोडून पोबारा केला.

हेही वाचा-चिंताजनक.. रेल्वेने मुंबईत आलेल्या १० प्रवाशांना कोरोनाची लागण, कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू

दोघा वाळू तस्करांना अटक-
तहसीलदार कल्पना ढवळे यांनी मंगळवारी प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात अनिकेत पाटील आणि गौरव पाटील यांच्या विरोधात अवैधरित्या वाळू चोरीप्रकरणी तक्रार दिली. तसेच वाळूने भरलेली पिकअप वाहन भरधाव वेगाने अंगावर घालून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार तासगाव पोलिसांनी तासगावातील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

Last Updated : Nov 25, 2020, 10:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details