सांगली - कुरपळ पोलिसांनी देशी दारूची अवैधरित्या वाहतूक होणार असल्याची माहिती मिळताच पथकाद्वारे केलेल्या कारवाईत तब्बल 2 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच या कारवाईत अवैध दारू वाहतुक करणाऱ्या वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रणजित बाजीराव माने (27 रा. बावची) असे दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
अवैधरित्या दारूची वाहतूक, सांगलीत पोलिसांकडून 2 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त
कुरपळ पोलिसांनी देशी दारूची अवैधरित्या वाहतूक होणार असल्याची माहिती मिळताच पथकाद्वारे केलेल्या कारवाईत तब्बल 2 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच या कारवाईत अवैध दारू वाहतुक करणाऱ्या वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
हेही वाचा -विषयच नाय..! गटारी अन् कोल्हापूर.. 2 हजार बकऱ्या, साडेचार टन चिकन फस्त
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी 7 च्या दरम्यान एक व्यक्ती अवैधरित्या दारू वाहतूक करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. दरम्यान, बावची येथून येडेनिपाणी मार्गे शिराळाकडे जाणाऱ्या एक चारचाकी (वाहन - मारुती ओमनी गाडी क्र. एम.एच. 10 एएन 2970) गाडीची झडती घेतली असता त्यात देशी दारूचे वीस बॉक्स आढळून आले. पोलीस ठाण्याला हे वाहन आणि चालकाला आणल्यानंतर त्यांची चौकशी केली असता, ही दारू बावची येथून लाडेगाव कार्वे आणि शिराळा येथे विक्री होणार होती, अशी कबुली वाहनचालक रणजित बाजीराव माने याने सांगितले.