सांगली -जिल्ह्याचा कोरोनाचा वाढता पॉझिटिव्हिटी दर पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंधाचा इशारा दिला आहे. त्यानंतर सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगलीकरांना कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देत पॉझिटिव्हिटी दर 10 टक्क्यांच्या पुढे गेल्यास चौथ्या स्तराचे निर्बंध लागू करण्याचा इशारा दिला आहे.
कमी झालेला पॉझिटिव्हिटी दर वाढू लागला
सांगली जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काही दिवसांपूर्वी कमी झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले होते. राज्य शासनाच्या निकषानुसार सांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर हा दहा टक्क्यांच्या आत आल्याने निर्बंध उठवण्यात आले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेसह इतर दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्याची कोरोनाग्रस्तांचा आकडा पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर हा 9.30 टक्क्यांवर पोहोचला आहे.