सांगली - सध्या सामना वाचायचा नाही, आणि संजय राऊतांच्या वर बोलायचे नाही, असे आपण ठरवले आहे अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान, हे सरकार पूर्णपणे हिंदू विरोधी आणि संवेदना शून्य असल्याचा आरोपही पाटील यांनी यावेळी केला आहे. ते सांगली मध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणार का ? -कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक पार पडत आहे. या निवडणूकीच्या प्रचारमध्ये आघाडी सरकारचे सगळे मंत्री मंत्रिमंडळ आणि देशातले खासदार जरी आले तरी भाजपा उमेदवार निवडून येणार असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या उदघाटनला शरद पवार यांना बोलावले पण देवेंद्र फडणवीस यांना बोलावले नाही. त्यामुळे आम्ही विरोध केला अन् अगोदरच उद्घाटन केले असा खुलासाही त्यांनी केला आहे.
किती दिवस लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणार - या उद्घाटनानंतर शरद पवार जर 2 तारखेला उदघाटन करणार असतील तर तो फक्त उदघाटनाचा रिटेक होईल. त्याचबरोबर देशाच्या पंतप्रधान यांनी कोरोना संपला आणि कोरोनावरची बंधन संपली असे सांगितले आहे. त्यामुळे कोरोना आता नॉर्मल आजारा सारखा आजार झाला आहे. मात्र, राज्य सरकार किती दिवस कोरोनाचे कारण देत लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणार आहे? असा प्रश्नही चंद्रकांत दातांनी उपस्थित केला आहे.
नो सामना ,नो संजय राऊत -सध्यासंजय राऊत यांच्याकडून सध्या कोणतीच प्रतिक्रिया येत नाही. याबाबत विचारले असता सध्या आपण सामना वाचायचे नाही आणि संजय राऊत यांच्यावर बोलायचे नाही असे ठरवले आहे. एक वेळ सामना वाचायचा विचार करू पण संजय राऊत यांच्यावर बोलण्यात पॉईंट नाही अशा शब्दात संजय राऊत यांच्यावर प्रतिक्रिया देणे टाळत चंद्रकांत पाटलांना संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
हेही वाचा -Vitthal-Rukmini Darshan : वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन सुरू