सांगली- जागतिक एड्स दिनानिमित्त सांगलीत आज एच.आय.व्ही एड्स जनजागृती प्रभात फेरी पार झाली. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी आणि जिल्हास्तरीय एड्स प्रतिबंध व नियंत्रण समिती सांगली यांच्यावतीने आयोजित या रॅलीमध्ये शासकीय कर्मचारी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयापासून या रॅलीला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या फेरीत सांगलीतील सामजिक संघटना, शालेय व महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी आणि शासकीय, पालिका आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने सहभागी झाले होते. स्टेशन चौक येथे या रॅलीचा समारोप झाला. यावेळी विद्यार्थ्यांना पथनाट्य सादर केले. तसेच शासकीय रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता प्रदीप दीक्षित व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी एड्स जनजागृती बाबत सामूहिक शपथ घेण्यात आली.