सांगली- शहराला महापुराचा वेढा पडला आहे. शहरात आणि उपनगरांमध्ये आता महापुराचे पाणी शिरले आहे. सखल भागासह शहरातल्या बाजार पेठेमध्येही पुराचे पाणी शिरले आहे. सांगली शहरातल्या महापुराची नेमकी स्थिती काय आहे, कुठे आणि किती पाणी पोहोचले याचा आढावा घेतला आहे आमचे सांगलीचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी...
सांगली शहरात घुसले महापुराचे पाणी, पाहा कुठे, किती पाणी... - महापुराचा वेढा
शहराला महापुराचा वेढा पडला आहे. शहरात आणि उपनगरांमध्ये आता महापुराचे पाणी शिरले आहे. सखल भागासह शहरातल्या बाजार पेठेमध्येही पुराचे पाणी शिरले आहे.
सांगली शहरात महापुराचे पाणी आता अनेक भागांमध्ये घुसले आहे. कालपर्यंत शहरातला सखल भाग असणारा दत्तनगर, काकानगर, सूर्यवंशी प्लॉट, मगरमच्छ कॉलनी या ठिकाणी असणारे शेकडो घरे पाण्याखाली गेली आहेत. सोमवारी रात्रीपासून पाण्याच्या पातळीमध्ये आणखी वाढ झाल्याने शहरातल्या मारुती चौक, टिळक चौक त्याचबरोबर शामराव नगर, सांगली कोल्हापूर रस्ता आता पाण्याखाली गेलेला आहे. त्याचबरोबर मल्टिप्लेक्सजवळचा आयुक्तांच्या बंगल्याशेजारीही आता पुराचा वेढा पडलेला आहे. जवळापास या सर्व भागात चार फुटांपासून दहा फुटांपर्यंत पाणी पोहचले आहे.