महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हेल्मेट एक वैशिष्ट्ये अनेक, सांगलीच्या युवकाने बनविले हायटेक 'हेल्मेट' - सांगली ताज्या बातम्या

सांगलीच्या विटामध्ये राहणाऱ्या आयटीआय शिक्षण घेतलेल्या भोजलींग कुंभार व त्याच्या मित्राने एक हायटेक 'हेल्मेट' बनवले आहे. सेन्सरवर आधारित असणाऱ्या या हेल्मेटमुळे दुचाकीच्या वेगावर नियंत्रण ठेवता येणार आहे. तसेच या हेल्मेटमध्ये अनेक वैशिष्टे आहेत.

hi-tech  helmet made by youth in sangli
सांगलीच्या युवकाने बनविले हायटेक 'हेल्मेट'; वैशिष्टे बघून व्हाल थक्क!

By

Published : Nov 12, 2020, 11:06 PM IST

सांगली -दुचाकीच्या वेगावर नियंत्रण ठेवणारे सुपर 'हेल्मेट' सांगलीच्या एका अवलियाने बनवले आहे. तब्बल 25 फीचर्स असणाऱ्या हायटेक 'हेल्मेट'मुळे दुचाकी आणि दुचाकीस्वाराला सुरक्षा मिळणार असल्याचा दावा हेल्मेट संशोधक भोजलिंग कुंभार या तरुणाने केला आहे.


अपघात रोखण्यासाठी होऊ शकते मदत-

दुचाकी अपघाताच्या पार्श्वभूमीवर हेल्मेटसक्ती अनेक राज्यात करण्यात आलेली आहे. मात्र, तरीही हेल्मेटच्या वापराबाबत अनेक ठिकाणी टाळाटाळ होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सांगलीच्या विटामध्ये राहणाऱ्या आयटीआय शिक्षण घेतलेल्या भोजलींग कुंभार व त्याच्या मित्राने एक हायटेक 'हेल्मेट' बनवले आहे. सेन्सरवर आधारित असणाऱ्या या हेल्मेटमुळे दुचाकीच्या वेगावर नियंत्रण ठेवता येणार आहे. हेल्मेट कनेक्टेड असणारे सेन्सर किट दुचाकीस ऍक्टिव्हेट केल्यास हेल्मेट घातल्या शिवाय दुचाकीचा वेग वाढणार नाही. त्यामुळे जर का हेल्मेट नसेल तर दुचाकीची वेग मर्यादा 40 च्या आता राहते, अशी टेक्नॉलॉजी हेल्मेटच्या माध्यमातून भोजलिंग कुंभार याने विकसित केली आहे. याशिवाय अनेक पातळ्यांवर हेल्मेट दुचाकी आणि दुचाकीस्वारांची सुरक्षा करण्याचे काम करणार आहे.

सांगलीच्या युवकाने बनविले हायटेक 'हेल्मेट'
कसे आहे, हायटेक हेल्मेट-
भोजलिंग कुंभार याने कोडिंग हार्डवेअर सिस्टीम डेव्हलप केली आहे. दोन पातळीवर हे सिस्टीम बनवले आहे. एक सिस्टीम हेल्मेट आणि आणि दुसरी दुचाकीला, अशी रचना करण्यात आली आहे. बाजारात उपलब्ध असणाऱ्या हेल्मेटमध्ये ऑटो आणि मॅन्युल कंट्रोलिंग सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. हेल्मेटला एक छोटेसे सौर पॅनल शिवाय चार्जिंग करण्याची सोय आहे. ज्यामुळे सर्व सिस्टीम ऍक्टिव्हेट राहते.
काय आहेत फायदे-
हेल्मेट घातले नाही, तर गाडीला चावी लावताच गाडी तुम्हाला रेड सिग्नल देते. त्यामुळे तुम्हाला हेल्मेट घालण्याचा तो एक इशारा असणार आहे. तरीही तुम्ही विना हेल्मेट गाडी चालवण्याचा प्रयत्न केला तर गाडीचा पिकअप मर्यादित राहणार आहे.
हेल्मेटचे मिळवले पेटेंट-
सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या आणि आयटीआय कॉलेजमध्ये आपले शिक्षण पूर्ण करणाऱ्या विट्यातील भोजलिंग कुंभार या तरुणाने अफलातून संशोधन करून दुचाकी आणि दुचाकीस्वाराच्या दृष्टीने फायदेशीर असणारे हेल्मेट निर्मितीची नोंदणी करून अश्या प्रकारचे हेल्मेट बनवण्याचे पेटेंट मिळवले आहे.
शासनाने दाखल घेऊन प्रोत्साहन देण्याची गरज-
विट्यासारख्या छोट्या शहरात आणि आपल्या 10 बाय 10 च्या खोलीत भोजलिंग कुंभार या युवा संशोधकाने अभिनव संकल्पनेच्या माध्यमातून अफलातून संशोधन केले आहे. लॉकडाऊनमध्ये भोजलिंग याने हे संशोधन केले आहे. आता या संशोधनाची दखल शासनाने घेऊन प्रत्येक दुचाकीमध्ये ही सिस्टम बसवण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे मत भोजलिंग कुंभार याने व्यक्त केले आहे.
हेल्मेट एक, वैशिष्टे अनेक
1. सौर ऊर्जाद्वारे हेल्मेट चार्जिंग.
२. हेल्मेट द्वारे मोबाईल चार्जिंग सुविधा.
३. मोबाईल कनेक्टिव्हिटी.
४. सेंटर लॉक सिस्टीम ज्यामुळे गाडी चोरीचा धोका टळणार आहे.
५. लाईट ब्लिकिंग. ( रात्रीच्या वेळी अंधारात गाडी शोधण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.)
६. लास्ट कॉल कनेक्ट सुविधा. (एखाद्या वेळीस दुचाकीस्वाराचा अपघात झाल्यास त्याच्या स्मार्ट फोनच्या लॉक सिस्टीममुळे नातेवाईकांशी संपर्क करणे अवघड होते, मात्र कुंभार यांच्या हेल्मेट मध्ये थेट लिस्ट नंबरवर एका क्लिकवर संपर्क साधणे शक्य आहे.)

७. अलार्म सिस्टम,

८. स्पिकर कॉलिंग सिस्टीम

९. गाडीच्या प्रमाणे हेल्मेट वर इंडिकेटर सुविधा.

१०. ब्रेक लावल्यानंतर गाडीच्या प्रमाणे हेल्मेटवर रेड लाईट.

११. प्रवासात रस्ता शोधण्यासाठी इनबिल्ट गुगल मॅप सिस्टीम.

अश्या अनेक छोट्या-मोठ्या अद्ययावत सिस्टम भोजलिंग कुंभार याने आपल्या हेल्मेटमध्ये विकसित केल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details