सांगली - जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगावामध्ये अज्ञात आजाराने कोंबड्या मृत्युमुखी पडल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान पशुसंवर्धन विभागाने मृत कोंबड्या तपासणीसाठी पाठवले आहेत. तर या घटनेमुळे मळणगावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
बर्ड फ्ल्युची धास्ती आणि अज्ञात रोगाने कोंबड्यांचा मृत्यू
राज्यात सद्या बर्ड फ्ल्यूच्या धास्ती आहे. सांगली जिल्ह्यात अद्याप बर्ड फ्लूची प्रादुर्भाव झाला नाही. मात्र कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगाव येथील एका पोल्ट्री शेडवरील 40 ते 50 कोंबड्या अज्ञात रोगाने मृत्यूमुखी पडल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान या घटनेची बातमी वार्यासारखी पसरली असून बर्ड फ्लूच्या धास्तीने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या घटनेची माहिती पशूसंवर्धन विभागाला मिळाल्यानंतर घटनास्थळी पशुसंवर्धन पथकाने दाखल होऊन, त्या मृत कोंबड्यांची पाहणी केली. त्याच बरोबर कोंबड्यांचा मृत्यू कशामुळे झाला आहे हे पाहण्यासाठी काही मृत कोंबड्या तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा -क्रिकेटच्या मैदानात नियतीने हरवले मात्र, निवडणुकीच्या रिंगणात जनतेने जिंकवले
हेही वाचा -सांगली जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीत महाविकास आघाडीची सरशी