महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगली बोट दुर्घटना; मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत - people who died in bramhanal

ब्रम्हनाळ येथील दुर्घटनेतील मृत व्यक्तीच्या कुटुंबाला 5 लाखांची मदत करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांनी दिली आहे.

मृत व्यक्ती

By

Published : Aug 8, 2019, 3:13 PM IST

Updated : Aug 8, 2019, 3:25 PM IST

सांगली- ब्रम्हनाळ येथे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेली खासगी बोट कृष्णा नदीत उलटली. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 16 जण बेपत्ता आहेत. या एकूण बोटीत 30 जण असल्याची माहिती मिळाली आहे. मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत करणार असल्याची घोषणा सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांना केली आहे.

ब्रह्मनाळ मधील घटनेबाबत अद्याप अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही, मात्र ही घटना खूप दुर्दैवी आहे. तसेच मृत व्यक्तीच्या कुटुंबाला 5 लाखांची मदत करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांनी दिली आहे.

सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीत पाहता सांयकाळपर्यंत पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 2 हेलिकॉप्टर दाखल होणार आहेत तर NDRF चे आणखी 10 बोटी आणि नौदलाची दोन पथके घटनास्थळी दाखल होणार आहेत. पूरस्थिती संध्याकाळपर्यंत स्थिर होईल, अशी माहिती देखील सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांनी दिली आहे.

Last Updated : Aug 8, 2019, 3:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details