सांगली -गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने सांगलीत पुन्हा दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे कोमेजलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. सध्या सर्व पिके फळधारणेच्या प्रक्रियेत आहे. अशा परिस्थितीत पावसाने दडी मारली होती. त्यामुळे पिके वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना होती. मात्र, दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे वारणा नदी दुधडी भरून वाहत आहे. परिणामी शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे.
वाळवा-शिराळा तालुक्यात मुसळधार पाऊस; कोमेजलेल्या पिकांना मिळाली नवसंजीवनी - Warna River latest News
सध्या सर्व पिके फळधारणेच्या प्रक्रियेत आहे. अशा परिस्थितीत पावसाने दडी मारली होती. त्यामुळे पिके वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना होती. मात्र, दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे वारणा नदी दुधडी भरून वाहत आहे. परिणामी शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे.
2019च्या ऑगस्ट महिन्यात कृष्णा आणि वारणा नदीकाठाला महापुराचा प्रचंड मोठा फटका बसला होता. 'ना भूतो, ना भविष्यती' अशा महापुराचा सामना सांगलीने केला होता. गेल्यावर्षी 5 ऑगस्टला शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होऊन १४९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे वारणा नदीला पूर येऊन वारणा नदीवरील छोटे-मोठे बंधारे आणि पूल पाण्याखाली गेले होते. वाळवा तालुक्याचा कोल्हापूर जिल्ह्याशी असणारा संर्पकही तुटला होता.
मागच्या वर्षीप्रमाणे आजही शिराळा तालुक्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून वारणा नदीवरील छोटे-बंधारे आणि काखे-मांगले पूल पाण्याखाली गेले आहेत. आणखी दोन दिवस असाच पाऊस राहिला तर पुन्हा पूर परिस्थिती उद्भवू शकते. यामुळे नदी काठावरील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.