सांगली- चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम असून धरण ९१ टक्के भरले आहे. यामुळे धरणातून वारणा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र पावसाची संततधार सुरूच असल्याने आजपासून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे वारणा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
चांदोलीत अतिवृष्टी कायम; धरण ९१ टक्के भरल्याने वारणा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू - varna
शिराळ्याच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम आहे. गेल्या २४ तासात १४४ मिलिमीटर इतका पाऊस झाला असून संततधार पावसामुळे चांदोली धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या या धरणात सध्या ३१.७५ टीएमसी इतका पाणीसाठा जमा झाला आहे.
शिराळ्याच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम आहे. शुक्रवारपासून १४४ मिलिमीटर इतका पाऊस झाला असून संततधार पावसामुळे चांदोली धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या या धरणात सध्या ३१.७५ टीएमसी इतका पाणीसाठा जमा झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला या धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे. धरणात होणारी लक्षणीय पाणी वाढ पाहता, धरण प्रशासनाकडून गुरुवारपासून धरणातून वारणा नदी पात्रात चार हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. आता हा विसर्ग टप्प्याटप्प्याने धरणाच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन वाढवण्यात येत आहे. शुक्रवारी धरणाचे चार वक्राकार दरवाजे अडीच फुटाने उघडले. धरणातून ८७६८ क्युसेक तर वीज निर्मिती गृहातून ८४० क्युसेक असा एकूण ९६०४ क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीत होत आहे.
तर धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम असल्याने आता चांदोली धरण ९१.८८ टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. सुमारे १३ हजार १९१ क्युस्केस इतक्या पाण्याचा विसर्ग वारणा नदीत करण्यात येत आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पूरपातळीत आणखी वाढ होणार असल्यामुळे, पाटबंधारे विभागाने वारणा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.