सांगली- शहरासह जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास गारपिटीसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे, उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, पावसामुळे फळपिकांना नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सांगलीत गारपिटीसह मुसळधार पावसाची हजेरी; फळपिकांना नुकसान होण्याची शक्यता
सुमारे १ तास हा अवकाळी पाऊस पडला, त्यामुळे शहरातल्या रस्त्यांवर पाणीच-पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यातल्या अनेक ग्रामीण भागातही काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह तर काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला. त्यामुळे, या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्ष, डाळिंबांसह अनेक पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
सुमारे १ तास हा अवकाळी पाऊस पडला, त्यामुळे शहरातल्या रस्त्यांवर पाणीच-पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यातल्या अनेक ग्रामीण भागातही काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह तर काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला. त्यामुळे, या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्ष, डाळिंबांसह इतर पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे घरात असणाऱ्या अनेक नागरिकांनी आपल्या घराच्या छतावर पावसाचा आंनद घेतला. मुसळधार पावसामुळे लोकांनी घराबाहेर जाणे टाळल्याने कोरोनाच्या लॉकडाऊनला याचा लाभ झाल्याचे पहायला मिळाले.
हेही वाचा-गो कोरोनो गो: इस्लामपूरच्या 'त्या' पहिल्या 4 बाधितांसह 14 जणांचा अहवाल 'निगेटिव्ह'