महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीतील दाम्पत्याकडून मुलीच्या जन्माचे थाटात स्वागत

सांगलीतील हारगुडे कुटुंबाने मुलीच्या जन्माचे मोठ्या थाटात स्वागत केले. तिच्या स्वागतासाठी रस्त्यापासून घराच्या दरवाज्यापर्यंत फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या. छोटा भीम आणि सुंदर परींचे छायाचित्रे लावून फुग्याची आरास करीत संपूर्ण अपार्टमेंट सजवण्यात आले. रांगोळी, फुगे आदी विविध प्रकारची सजावट करून सुरुवातीला 'आपल्या लक्ष्मीचे वेलकम' असे लिहून स्वागत करण्यात आले.

मुलीच्या जन्माचे असेही स्वागत
मुलीच्या जन्माचे असेही स्वागत

By

Published : Jan 15, 2020, 9:01 PM IST

सांगली - येथे मुलीच्या जन्माचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले आहे. रांगोळी, फुलांचा सडा, फुग्याची आरास आणि स्वागतासाठी छोटा भीम, सुंदर पऱ्यांची छायाचित्रे अशा आगळ्यावेगळ्या स्वरूपाने सांगलीच्या हारुगडे दाम्पत्याच्या घरी 'जिजाऊ'चे आगमन झाले आहे.

मुलीच्या जन्माचे असेही स्वागत

एकीकडे देशात स्त्रीभ्रूण हत्या, असुरक्षिततेसारखे अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले असताना सांगलीत मात्र मुलीच्या जन्माचे जोरदार स्वागत करण्यात आले. सांगलीच्या विष्णुगंगा अपार्टमेंटमध्ये तेजस हारुगडे आणि वैष्णवी हारगुडे हे दाम्पत्य राहतात. त्यांना ९ जानेवारीला कन्यारत्न झाले. आई वैष्णवी आणि तिच्या बाळाचे घरी आगमन होणार असल्यामुळे त्यांच्या घरी प्रसन्न आणि आनंदी वातावरण होते. बाळ आणि विशेष म्हणजे मुलगी घरी येणार म्हणून हारगुडे कुटुंबियांचा आनंद द्विगुणीत झाला होता. तिच्या स्वागतासाठी रस्त्यापासून घराच्या दरवाज्यापर्यंत फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या. छोटा भीम आणि सुंदर परींचे छायाचित्रे लावून फुग्याची आरास करीत संपूर्ण अपार्टमेंट सजवण्यात आले. रांगोळी, फुगे आदी विविध प्रकारची सजावट करून सुरुवातीला 'आपल्या लक्ष्मीचे वेलकम' असे लिहून स्वागत करण्यात आले. यासोबत, औक्षण करत हारगुडे कुटुंबाच्या घरात चिमुकलीचे प्रवेश झाला. राजमाता जिजाऊ मांसाहेब यांच्या प्रतिमेसमोर या कन्येला ठेवून तिची ओवाळणी केली आणि तिचे नाव 'जिजा' असे ठेवले.

हेही वाचा - 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' प्रकरणी राष्ट्रवादीकडून भाजपच्या निषेधार्थ आंदोलन

आपल्याला मुलगीच हवी अशी वैष्णवी आणि तेजसची मोठी इच्छा होती. 'जिजा'च्या रुपाने त्यांची इच्छापूर्ती झाली. त्यामुळे हारगुडे कुटुंबियांनी 'जिजाचे' मोठ्या धडाक्यात स्वागत केले. त्यांच्या उत्साहात शेजाऱ्यांनीही मोठ्या आनंदाने सहभाग घेत 'जिजा'चे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. तर, मुलीच्या आगमनाचे स्वागत संपूर्ण शहरात चर्चेचा विषय बनला आहे. शिवाय यामुळे 'बेटी बचाव'चा संदेशही हारगुडे कुटुंबांनी यानिमित्ताने दिला आहे.

हेही वाचा - अंधत्वावर मात करत इस्लामपूरमधील शितल साळुंखे बनली 'रेडिओ जॉकी'

ABOUT THE AUTHOR

...view details