महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Kasegaon Murder Case : कासेगाव खून प्रकरणी हनुमंत पाटील यांना अटक - Hanumant Patil arrested in Kasegaon

कासेगाव येथे दोन महिन्यांपूर्वी डोक्यात दगड घालून करण्यात आलेल्या निर्घृण खुनाचा ( Kasegaon Murder Case ) पोलिसांनी अखेर छडा लावला आहे. हनुमंत पाटील या संशयिताला अटक ( Hanumant Patil arrested in Kasegaon murder case ) करण्यात आली आहे.

Kasegaon Murder Case
कासेगाव खून प्रकरण

By

Published : Sep 16, 2022, 9:11 AM IST

सांगली - कासेगाव येथे दोन महिन्यांपूर्वी डोक्यात दगड घालून करण्यात आलेल्या निर्घृण खुनाचा ( Kasegaon Murder Case ) पोलिसांनी अखेर छडा लावला आहे. हनुमंत पाटील या संशयिताला अटक ( Hanumant Patil arrested in Kasegaon murder case ) करण्यात आली आहे. मृत मज्जिद आत्तार याच्याकडून शिवीगाळ करण्यात येत असल्याच्या रागातून हा खून करण्यात आल्याचं उघडकीस ( Kasegaon murder case revealed ) आले आहे.

पोलीस अधीक्षक सांगली यांची प्रतिक्रिया

डोक्यात दगड घालून खून -दोन महिन्यांपूर्वी 21 जुलै 2022 रोजी वाळवा तालुक्यातील कासेगाव येथे मज्जीद आत्तार,वय 60 या व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. या खुनाचा तब्बल दोन महिन्यानंतर छडा लावण्यात सांगली पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी हणमंत पाटील,वय 44 या व्यक्तीस अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम ( Superintendent of Police Dixit Gedam ) यांनी दिली आहे.हणमंत पाटील व मृत मज्जीद

खून केल्याचे तपासात समोर -आत्तार हे दोघे ओळखीची असून मयत मज्जीद आत्तार याने हणमंत पाटील यांना दारूच्या नशेत शिवीगाळ केली होती. त्याचा जाब विचारल्याने आत्तार याने पुन्हा शिवीगाळ सुरू केली. रागातून हणमंत पाटील यांनी आत्तार यांच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे तपासात समोर आले आहे,अशी माहीती पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details