महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यातील हज यात्रेकरुंना तीन दिवस मुंबईत राहण्याची गरज नाही - हज कमिटी

देशातून मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव हज यात्रेसाठी सौदीमध्ये जातात. यंदाही हज कमिटीच्या माध्यमातून हजसाठी यात्रेकरू रवाना होणार आहेत. यामध्ये यंदाच्या वर्षी महाराष्ट्र राज्यातून १४,६९५ हज यात्रेकरू जाणार आहेत. तर यामध्ये सांगली जिल्ह्यातील २९४ हज यात्रेकरूंचा समावेश आहे.

मध्यभागी महाराष्ट्र राज्य हज कमिटीचे चेअरमन जमाल सिद्दिकी पत्रकारांना माहिती देताना

By

Published : Jun 14, 2019, 6:23 PM IST

सांगली - हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंना मुंबईत तीन दिवस राहण्याची गरज राहणार नाही. आता त्यांच्या घरातून रिपोर्टिंगची सोय होणार आहे. हा निर्णय हज कमिटीकडून यंदाच्या वर्षापासून घेण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य हज कमिटीचे चेअरमन जमाल सिद्दिकी यांनी आज दिली आहे.

राज्यातील हज यात्रेकरुंना तीन दिवस मुंबईत राहण्याची गरज नाही - हज कमिटी

हज यात्रेकरूंना त्यांची यात्रा अधिक सुखकर होण्याच्या दृष्टीने अनेक सुविधा हज कमिटीकडून उपलब्ध करून देण्यात येत असल्याचा विश्वास सिद्दिकी यांनी व्यक्त केला आहे. सांगलीमध्ये आयोजित हज यात्रा मार्गदर्शन शिबीरप्रसंगी ते बोलत होते.

देशातून मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव हज यात्रेसाठी सौदीमध्ये जातात. यंदाही हज कमिटीच्या माध्यमातून हजसाठी यात्रेकरू रवाना होणार आहेत. यामध्ये यंदाच्या वर्षी महाराष्ट्र राज्यातून १४,६९५ हज यात्रेकरू जाणार आहेत. तर यामध्ये सांगली जिल्ह्यातील २९४ हज यात्रेकरूंचा समावेश आहे. या यात्रेकरुंना यात्रे दरम्यान घ्यावयाची काळजी, तेथील कायदे याचे मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य हज कमिटीच्या माध्यमातून खिदमत हुज्जाज कमिटीकडून सांगलीमध्ये शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

आज या शिबिरात महाराष्ट्र राज्य हज कमिटीचे चेअरमन जमाल सिद्दीकी यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांच्यासोबत कमिटीचे सदस्य इमरान मुजावर आकाश मुल्ला, खिदमत हुज्जाज कमिटीचे अध्यक्ष हाजी मुनिर अत्तार, माजी नगरसेवक मुन्ना कुरणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी हज यात्रेकरूंना अमान सिद्दिकी यांनी मार्गदर्शन करत यंदाच्या वर्षापासून त्यांना मुंबईमध्ये तीन दिवस आधी रिपोर्टिंगसाठी थांबायचा नियम रद्द करण्याचा निर्णय कमिटीकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे हज यात्रेकरूंच्या घरी जाऊनच जिल्हा हज कमिटी ऑनलाईन रिपोर्टिंग करून त्यांच्या नियोजित वेळेनुसार त्यांना विमानतळावर पोहोचवण्याची व्यवस्था करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील हज यात्रेकरूंचे पहिले विमान 14 जुलै रोजी जाणार आहे. हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना अधिक सुविधा मिळावी यासाठी आता जिल्ह्यात हज कमिटीचे निर्माण, स्वयंसेवी संस्थाचा समावेश आणि हाजी दोस्त बनवण्याचा निर्णयही हज कमिटीकडून घेण्यात आल्याची माहिती यावेळी जमाल सिद्दीकी यांनी दिली आहे. कमी खर्चात हज यात्रा सर्वसामान्य मुस्लिम बांधवांनाही करता यावी, यासाठी 2020 पर्यंत समुद्रीमार्गे जहाजातून हज यात्रा सुरू होईल, असा विश्वासही सिद्दीकी यांनी व्यक्त केला आहे.

फसवणुक करणाऱ्यांचे परवाने रद्द करणार-
तसेच आज यात्रेमध्ये खासगी टूर कंपन्यांकडून होणारी फसवणूक लक्षात घेता, यापुढील काळात इतर वेळी हज यात्रेला जाण्यासाठी हज कमिटीकडून सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ज्या लोकांकडून हज यात्रेकरूंची फसवणुकीचे प्रकार घडले आहेत, त्यांचा शोध घेण्यात येणार आहे. त्यांच्यावर लवकरच गुन्हे दाखल करून त्यांचे परवानेही रद्द करण्यात येणार असल्याचे सिद्दिकी यांनी स्पष्ट केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details