सांगली - येडेनिपाणी फाटा येथे अवैध गुटखा वाहतूक करणाऱया वाहनासह एका आरोपीला अटक करण्यात आली. भालचंद्र सुभाष भापरेकर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर कुरळप पोलिसांनी ही कारवाई केली. यात 1 लाख 58 हजार रुपयांच्या गुटख्यासह 6 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
येडेनिपाणी फाट्यावर एका गाडीतून गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती कुरळप पोलिसांना मिळाली होती. यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांनी सापळा रचून शनिवारी रात्री कारवाई केली. भालचंद्र सुभाष भापरेकर हा इस्लामपूरवरुन पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर येडेनिपाणी फाटामार्गे शिराळयाकडे गुटखा घेऊन जात होता. पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये विविध प्रकारच्या गुटख्याची पोती सापडली.