सांगली - पिस्तुल विक्रीसाठी शहरात आलेल्या तरुणाला गुंडा विरोधी पथकाने सापळा लावून अटक केली आहे. यात २ पिस्तुलांसह ६ जिवंत काडतुसे आणि सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहरातील शिंदेमळा येथील लव्हिली सर्कल येथे ही कारवाई करण्यात आली.
पिस्तुल विक्री करणाऱ्या तरुणाला अटक; ६ जिवंत काडतुसांसह सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त - पिस्तुल
दिनेशकुमार चौधरी असे आरोपीचे नाव आहे. तो राजस्थानचा रहिवासी असून पिस्तुल विक्रीसाठी शहरात आल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानंतर पथकाचे प्रमुख संतोष डोके यांनी सापळा रचून त्याला अटक केली.
जप्त केलेली काडतुसे
दिनेशकुमार चौधरी असे आरोपीचे नाव आहे. तो राजस्थानचा रहिवासी असून पिस्तुल विक्रीसाठी शहरात आल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानंतर पथकाचे प्रमुख संतोष डोके यांनी सापळा रचून त्याला अटक केली. यावेळी तो फक्त पिस्तुल विक्रीसाठी सांगलीत आला असल्याची कबुली त्यांनी दिली. पिस्तुल कोणाला विकणार होता? तसेच आतापर्यंत किती पिस्तुले विकली? यासंदर्भातील अधिक तपास पोलीस करीत आहेत.