महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीकरानों काळजी घ्या अन् कोरोनाची दुसरी लाट थोपवा - पालकमंत्री जयंत पाटील - जयंत पाटील यांचे सांगलीकरांना आवाहन

संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणेच सांगली जिल्ह्यातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सांगलीकरांनी जास्त काळजी घेणे गरजेचे असून नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करून कोरोनाची दुसरी लाट थांबवावे, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगलीकर नागरिकांना केले आहे.

Guardian Minister Jayant Patil's appeal to Sangli people
Guardian Minister Jayant Patil's appeal to Sangli people

By

Published : Mar 27, 2021, 8:41 PM IST

Updated : Mar 27, 2021, 8:46 PM IST

सांगली -संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणेच सांगली जिल्ह्यातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सांगलीकरांनी जास्त काळजी घेणे गरजेचे असून नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करून कोरोनाची दुसरी लाट थांबवावे, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगलीकर नागरिकांना केले आहे.

कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा वाढ..

सांगली जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून सांगली जिल्ह्यातील आठवडा बाजारांवर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. कोरोना नियमांची अंमलबजावणी कडकपणे करण्यात येत आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ, लक्षात घेऊन सांगलीकर जनतेने कोरोना नियमांचं पालन करावं, याबाबतचे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.

जयंत पाटील यांचे सांगलीकरांना आवाहन
नियम पाळा, दुसरी लाट थांबवा..
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, गर्दीची ठिकाणे विशेषत: बाजाराच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.कोरोणाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही.लाॅकडाऊन मुळे गोरगरिबांच्या उरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. अर्थव्यवस्था संकटात येते. पण गर्दी थांबविली तर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो.त्यामुळे बाजारात जाणे टाळा, कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करा. मास्क घालणे, स्वच्छ हात धुणे, गरज असेल तरच घराच्या बाहेर पडणे, योग्य अंतर ठेवणे व इतरांचीही तेवढीच काळजी घेणे या गोष्टींचे पालन करावे, आपण मर्यादा सांभाळल्या तर महिन्याभरामध्ये ही लाट खाली येईल. त्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी. हीच आपल्याला नम्र विनंती आहे. मागील वर्षासारखी परिस्थिती निर्माण होऊ द्यायची नसल्यास सर्व नागरिकांचे योगदान महत्वाचे असल्याचे मत पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
Last Updated : Mar 27, 2021, 8:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details