महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालकमंत्री जयंत पाटलांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी, जतमधील शेतकऱ्याशी साधला संवाद - सांगली पालकमंत्री जयंत पाटील बातमी

पीक किती दिवसापासून पाण्यात आहे, किती नुकसान झाले आहे, आपले क्षेत्र किती आहे, याबाबत विचारणा केली. मका या पिकाची पावसामुळे कणसावरच मक्याची उगवण झाल्याचे निरीक्षण केले. दरम्यान, याबाबत मंत्री पाटील यांनी उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ यांना नुकसानग्रस्त फळबागांना विमा भरपाई मिळणे विषयी कोणता पाठपुरावा सुरू आहे, डाळींब बागा कोणत्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे अडचणीत आहेत, याची विचारणा मंत्री पाटील यांनी केली.

guardian minister jayant patil inspects the damaged area at jat taluka in sangli district
पालकमंत्री जयंत पाटलांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी

By

Published : Oct 17, 2020, 5:37 PM IST

सांगली - जत तालुक्यासह जिल्ह्यात परतीचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याअनुषंगाने सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील हे प्रशासनाला सोबत घेवून शनिवार (दि.१७आक्टोबर ) जत तालुक्याच्या दौऱ्यावर होते. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाला आलेला घास हिरावून घेतल्यासारखी परिस्थिती झाली आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करून सरकार शेतकऱ्यांना निश्चितपणे मदत करणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री जयंतराव पाटील यांनी दिली. शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन वस्तुनिष्ठ पंचनामा करण्याबाबतच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे ते म्हणाले.

पालकमंत्री जयंत पाटलांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी
त्यांनी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची येळवी व अचकनहळ्ळी या गावातील नुकसानग्रस्त पिकाची पाहणी केली व शेतकऱ्याशी संवाद साधला. धोत्रे यांच्या शेतात रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवडीचा शुभारंभ मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, तहसीलदार सचिन, सुरेशराव शिंदे, रमेश पाटील, उत्तम चव्हाण, चन्नाप्पा होर्तीकर, बसवराज धोडमणी सिद्धूअण्णा शिरसाड, आप्पाराया बिराजदार, शिवाजी शिंदे, अशोक कोळी, पवन कोळी पाटील, दर्याप्पा जमदाडे आदी उपस्थित होते.यावेळी मंत्री पाटील यांनी शेतकरी यांच्याशी संवाद साधत पीक किती दिवसापासून पाण्यात आहे, किती नुकसान झाले आहे, आपले क्षेत्र किती आहे, याबाबत विचारणा केली. मका या पिकाची पावसामुळे कणसावरच मक्याची उगवण झाल्याचे निरीक्षण केले. दरम्यान, याबाबत मंत्री पाटील यांनी उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ यांना नुकसानग्रस्त फळबागांना विमा भरपाई मिळणे विषयी कोणता पाठपुरावा सुरू आहे, डाळींब बागा कोणत्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे अडचणीत आहेत, याची विचारणा केली.यावेळी कृषिअधिकारी वेताळ यांनी विमा कंपनीने पीक विमा भरपाई देण्याबाबतचे यावर्षी नवीन निकष लागू केले आहेत. सलग तीन ते पाच दिवस दररोज 45 मिली लिटर पाऊस झाल्यास (भरपाई) विमा मिळण्यास पात्र होतो. प्रगतशील शेतकरी माने यांनी प्रजन्यमापक यंत्र मंडळ असलेल्या ठिकाणी पावसाचे प्रमाण असमतोल असल्याने इतर गावात पाऊस किती झाला हे निश्चितपणे समजून येत नाही. त्यामुळे शेतकरी लाभापासून वंचित राहत असल्याची माहिती दिली.आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जत तालुक्याला 5 पर्जन्यमापक यत्रे बसविण्याबाबत चर्चा झाली असल्याचे सांगितले. यावेळी मंत्री पाटील यांनी याला दुजोरा दिला. पर्जन्यमापक यत्रे बसवली जातील, असे सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details