महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 11, 2021, 7:49 AM IST

ETV Bharat / state

द्राक्ष दरांकडे लक्ष वेधण्यासाठी शासकीय कार्यालयात 'द्राक्ष वाटप' आंदोलन

द्राक्षांचे आगार म्हणून सांगली जिल्ह्याची ओळख आहे. मात्र, शासनाच्या धोरणांमुळे येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकाला अपेक्षेप्रमाणे दर मिळत नाही. याविरोधात जिल्हा नियोजन समिती आणि शेतकऱ्यांनी आंदोलन केले आहे.

sangli grapes prices agitation news
सांगली द्राक्ष किंमत आंदोलन न्यूज

सांगली - द्राक्षांच्या कमी झालेल्या दरांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सांगलीमध्ये जिल्हा सुधार समिती व शेतकर्‍यांच्यावतीने शासकीय कार्यालयात गांधीगीरी करण्यात आली. अधिकाऱ्यांना द्राक्ष वाटप करून आंदोलन करण्यात आले.

जिल्हा नियोजन समिती आणि शेतकऱ्यांनी द्राक्ष दरांबाबत निवेदन दिले

कमी झालेल्या दराच्या निषेधार्थ वाटली द्राक्ष -

द्राक्षांचे आगार म्हणून सांगली जिल्ह्याची ओळख आहे. 32 हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. उच्च प्रतीचे आणि निर्यातक्षम द्राक्ष जिल्ह्यामध्ये पिकतात. गेल्यावर्षी कोरोना लॉकडाऊन, त्यापूर्वी अतिवृष्टी अशा संकटांना द्राक्ष उत्पादक शेतकरी बळी पडला आहे. मात्र, यंदाच्या वर्षी द्राक्षांना अपेक्षेप्रमाणे दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. व्यापारी आणि दलाल यांच्याकडून कृत्रिमपणे दर पाडले जातात. सरकारच्या धोरणांमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अशा संकटांना सामोरे जावे लागत आहे, असा आरोप शेतकरी आणि जिल्हा सुधार समितीने केला आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या द्राक्षांना दर मिळावा, या मागणीसाठी जिल्हा सुधार समितीच्यावतीने सांगलीमध्ये अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले आहे. सांगलीच्या जिल्हाधिकारी व कृषी कार्यालयात सुधार समितीचे अध्यक्ष अमित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कर्मचारी व अधिकाऱ्यांना मोफत द्राक्ष वाटप करून मागण्यांचे निवेदन दिले.

द्राक्ष दरासाठी मांडल्या 'या' मागण्या -

राज्य शासनाने या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या द्राक्षाला दर देण्यासाठी हमीभाव तयार करावा, साखरेवर जसे नियंत्रण असते त्याप्रमाणे शासकीय व्यवस्था निर्माण करावी, द्राक्षांचे प्रत्येक जिल्ह्यात द्राक्ष महोत्सव घ्यावेत, द्राक्षांचा शालेय पोषण आहारात समावेश करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details