सांगली- जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे द्राक्षबागा पुन्हा एकदा संकटात सापडल्या आहेत. सुमारे 40 हजार एकर द्राक्षबाग क्षेत्र धोक्यात आले आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांमध्ये चिंता वाढली आहे.
ढगाळ वातावरणामुळे द्राक्षबागा पुन्हा संकटात हेही वाचा - कृष्णा नदी प्रदूषणाच्या विळख्यात; पालिकेचे दुर्लक्ष
आधी महापूर, नंतर अतिवृष्टी यामुळे सांगली जिल्ह्यातील द्राक्षबाग शेती पुरती उध्वस्त झाली आहे, अशा परिस्थितीतून कशातरी वाचलेल्या द्राक्षबागा अनेक शेतकऱ्यांनी जीवापाड मेहनत करून आणि कर्ज काढून जगवल्या आहेत. मात्र, आता हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे या बागांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा - जागतिक एड्स दिनानिमित्त सांगलीत एच.आय.व्ही जनजागृती प्रभात फेरी
तर आणखी 2 दिवस असेच ढगाळ वातावरण राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना समोर या बागा कशा वाचवायच्या हा प्रश्न आहे. त्यामुळे सरकारने लवकरात-लवकर द्राक्ष बाग शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.