महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Gram Panchayat Election 2022 : 'या' जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी सुरू ; मतांसाठी उमेदवार शेतकऱ्यांच्या बांधावर

सांगली जिल्ह्यातल्या 448 ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू (Gram Panchayat Election in Sangli district) आहेत. या ग्रामपंचायत निवडणूकांचे प्रचार सुरू आहेत. मते मागण्यासाठी उमेदवार चक्क शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर गेल्याचे चित्र पाहायला (Sangli district election campaign start) मिळाले.

Gram Panchayat Election 2022
ग्रामपंचायत निवडणूक 2022

By

Published : Dec 12, 2022, 2:10 PM IST

सांगली : जिल्ह्यातल्याग्रामपंचायत निवडणूक वातावरणआता चांगलेच वाढले (Gram Panchayat Election 2022) आहे. गावागावात निवडणुकीचा प्रचाराची धामधूम सुरू आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार वेगवेगळ्या शक्कल लढवत आहेत. त्यातूनच मिरज तालुक्यातील बेडग या ठिकाणी उमेदवार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना कुठे कणीस सोलण्यासाठी, तर कुठे मिरच्या तोडण्यासाठी हातभार लावत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

ग्रामपंचायत निवडणूक 2022



मतांचा जोगवा :सांगली जिल्ह्यातल्या 448 ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवार मतदार राजाच्या दारादारापर्यंत जाऊन मतांचा जोगवा मागत आहेत, हे सर्वसामान्य चित्र सगळीकडेच पाहायला मिळत (Gram Panchayat Election in Sangli district) आहे.

मतांसाठी साद :मात्र मिरज तालुक्यातल्या बेडग या ठिकाणी शेतकरी मतदाराच्या थेट शेताच्या बांधावर जाऊन मतदारांना आपल्याकडे आकर्षित करत असल्याचे पाहायला मिळत आहे. गावातल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन उमेदवार कणीस सोलण्याबरोबर त्यांना मिरची तोडण्याबरोबर शेती कामात हातभार लावत असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन उमेदवार आपल्या मतदार राजाला मतांसाठी साद घालत असल्याची चर्चा गावात चांगलीच रंगली (Sangli district election campaign start) आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details