महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगली धान्‍य वाटपामध्‍ये राज्‍यात अग्रेसर... सहा दिवसात 3 लाख जणांना धान्य वाटप - कोरोना महाराष्ट्र अपडेट बातमी

1 ते 6 एप्रिल या सहा दिवसात सांगली जिल्ह्यातील 3 लाख 2 हजार 793 शिधापत्रिका धारकांना तब्बल 7 हजार 240 मे.टन अन्नधान्याचे वाटप केल्‍याची माहिती सांगलीच्या जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी दिली. तसेच शुक्रवारपासून तांदूळ मोफत होणार आहे.

grain-distribution-to-3-lakh-people-in-six-days-sangli
grain-distribution-to-3-lakh-people-in-six-days-sangli

By

Published : Apr 11, 2020, 12:33 PM IST

सांगली - जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही शिधापत्रिकांमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 3 लाख 92 हजार आहेत. या लाभार्थ्यांना 1 हजार 356 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जात आहे.

1 ते 6 एप्रिल या सहा दिवसात सांगली जिल्ह्यातील 3 लाख 2 हजार 793 शिधापत्रिका धारकांना तब्बल 7 हजार 240 मे.टन अन्नधान्याचे वाटप केल्‍याची माहिती सांगलीच्या जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी दिली. तसेच शुक्रवारपासून तांदूळ मोफत होणार आहे.

हेही वाचा-#लाॅकडाऊन: वाहतूक ठप्प..! राज्यातील वाहनचालकांवर उपासमारीची वेळ

तर सहा दिवसात तब्बल 77.22 टक्के कार्डधारकांना अन्नधान्याचे वाटप झाले असून सांगली जिल्‍हा धान्‍य वाटपामध्‍ये राज्‍यात अग्रेसर ठरलेला आहे. कोणत्याही प्रकारचा रेशन दुकानांचा तुटवडा जिल्हात नसून रेशन धान्य दुकानदार हे कार्डधारकांचे दारात सुद्धा जाऊन धान्य वितरित करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details