महाराष्ट्र

maharashtra

मनात जिद्द असेल तर वयाची अडचण येत नाही! ८२ वर्षांच्या आजोबांची 'सांगली ते नांदेड' सायकलवारी

By

Published : Dec 10, 2019, 7:15 PM IST

Updated : Dec 10, 2019, 11:30 PM IST

व्यक्तीला त्याचे ध्येय गाठायचे असेल, तर वयाची कधीही अडचण येत नाही. फक्त मनात जिद्द असणे आवश्यक असते. वयाच्या ८२ व्या वर्षी देखील दुर-दुरच्या प्रदेशात सायकलवारी करणाऱ्या सांगलीतील आजोबांची ही प्रेरक कथा...

Govind Paranjpe from sangli is an elderly man who is traveling on a cycle
सांगलीतील गोविंद परांजपे

सांगली -माणसाच्या वयात काही नसते, फक्त त्याच्याकडे जिद्द असावी लागते. ती जिद्द असेल तर व्यक्ती यशाची शिखरे सहज पार करू शकतो. सांगलीच्या एका 82 वर्षीय आजोबांनीही आपल्या कृतीतून हे दाखवून दिले आहे. गोविंद परांजपे असे या आजोबांचे नाव असून त्यांनी सायकलवर 'सांगली ते नांदेड' असा प्रवास सुरू केला आहे. नांदेड येथे भरणाऱ्या राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक संमेलनसाठी ते सांगलीतून नांदेडकडे निघाले आहेत.

सांगलीतील गोविंद परांजपे या 82 वर्षीय आजोबांचा सांगली ते नांदेड सायकलवरून प्रवास...

हेही वाचा... कांदा साठवणुकीचे नियम आणखी कडक; किरकोळ विक्रेत्यांकरता 'हा' नवा नियम लागू

खरे तर प्रत्येक व्यक्तीला काही ना काही छंद असतो. मात्र हा छंद वयाच्या मर्यादा ओलांडल्यानंतर संपुष्टात येतो. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 79 वर्षीय शरद पवार यांनी आपल्या इच्छा शक्तीच्या जोरावर सर्व काही साध्य होऊ शकते, हे दाखवून दिले. तशाच प्रकारची इच्छा शक्ती सांगलीतील 82 वर्षी गोविंदकाका परांजपे यांच्यात पाहायला मिळत आहे.

हेही वाचा... 'सैराट'ची पुनरावृत्ती; आंतरजातीय प्रेमसंबंधाला विरोध करत बापानेच केले मुलीच्या शरीराचे तुकडे

सायकल प्रवासाची आवड असणारे गोविंदकाका हे वयाच्या 82 वर्षी देखील सायकलने प्रवास करतात. आता त्यांनी सांगलीहून थेट नांदेड, असा प्रवास सुरू केला आहे. 450 किलोमीटरचा हा प्रवास ते सायकलवरून करणार आहेत. विशेष म्हणजे हा प्रवास नांदेड येथे होणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या राष्ट्रीय संमेलनासाठीचा आहे. हे अंतर 15 डिसेंबरपर्यंत पार करत ते नांदेडमध्ये संमेलनासाठी उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा... सीआरपीएफ जवानांनी एकमेकांवरच झाडल्या गोळ्या; दोघांचा मृत्यू झाल्याची सूत्रांची माहिती

सांगली, सोलापूर, लातुरमार्गे ते नांदेडला पोहोचतील. वयाची 80 वर्षे उलटली तरी आजपर्यंत कित्येक किलोमीटरचा प्रवास त्यांनी सायकलवरून पूर्ण केला आहे. यापूर्वी मे 2019 मध्ये त्यांनी सायकलवर 'Sea to Sky' हा कन्याकुमारी ते नेपाळ दौरा पूर्ण केला आहे. मागील ५ वर्षांमध्ये लखनौ, इंदौर, नागपूर हा प्रवास देखील गोविंदकाकांनी सायकलवरूनच केला आहे.

Last Updated : Dec 10, 2019, 11:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details