सांगली- 26 जानेवारी 2001 मध्ये जम्मू काश्मीर येथे जवानांच्या गाडीवर दहशतवाद्यांनी बॉम्ब टाकला. तो बॉम्ब हातात पकडत स्वतःचा जीव देत, कित्येक जवानांचा जीव वाचवणाऱ्या झाकीर रहिमतुल्ला पठाण याच्या कुटुंबीयांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळत आहे. या हुतात्मा जवानाची आई आजही मुख्य गावापासून तीन किलोमीटर अंतरावर एका शेतात पडक्या घरात राहते. जिथे गेली वीस वर्षांपासून वीज पोहचलीच नाही. ना ग्रामपंचायत ना शासनाने, कोणीही त्यांच्या या परिस्थितीची दखल घेतली नाही.
हेही वाचा... कर्तबगारीने उंच झेपावलेल्या अन् अज्ञानामुळे पिचलेल्या स्त्रियातील अंतर कमी व्हावे - डॉ. अरुणा ढेरे
वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथील झाकीर रहिमतुल्ला पठाण, हा जवान आणि त्याची टीम 26 जानेवारी 2001 रोजी जम्मू काश्मीर येथील राष्ट्रध्वजाचा कार्यक्रम संपवून कुपवाडा येथे जात होती. त्यावेळी अचानक दहशतवाद्यांनी गाडीच्या ताफ्यावर बॉंम्ब टाकलेला. तेो बॉम्ब झाकीरने आपल्या हातात झेलून धरला होता. आपल्या सर्व सैनिक मित्रांना त्यानी गाडीतून उड्या टाकायला सांगितल्या. त्यानंतर तो बॉम्ब त्याच्या हातात फुटला, त्यातच झाकीरला वीरमरण आले.
हेही वाचा... के-4 सबमरीन लॉन्चड बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
आज मात्र, देशातील अनेक जवानांचे प्राण वाचवणाऱ्या त्या हुतात्मा जवानाच्या आईला अंधारात जीवन कंठीत करावे लागत आहे. 21 वर्षांचा पोटचा गोळा गेल्याने त्यावेळी झाकीरच्या आई लैलाबी पठाण ह्या पुरत्या कोलमडून गेल्या होत्या. मुलगा सैन्य दलात असल्याने घरात लैलाबी त्यांचे पती रहिमतुल्ला पठाण आणि सून असा परिवार होता. परंतु झाकीरच्या हौतात्म्यानंतर सून आपल्या माहेरी गेली आणि लैलाबी ह्या आपल्या पतीसोबत वाटेगावापासून तीन किलोमीटर अंतरावर शेतातील एका पडक्या घरामध्ये राहत आहेत.