महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bullock Cart Race : राज्य सरकारने बैलगाडी शर्यत प्रकरणाचे गुन्हे आठ दिवसात मागे घ्यावेत- गोपीचंद पडळकर

बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्याच्या मागणीसाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राज्यभर मोठे आंदोलन ( Farmers agitation for Bullock cart race permission ) उभारले होते. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांचा शेतकरी, बैलगाडी चालक-मालक यांच्यावतीने जाहीर सत्कार ( Procession of Gopichand Padalkar in Sangli district ) करण्यात आला. आटपाडीच्या झरे याठिकाणी जंगी अशी बैलगाड्यांची मिरवणूकही काढण्यात आली. यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर सहभागी झाले होते.

By

Published : Dec 16, 2021, 7:59 PM IST

Updated : Dec 16, 2021, 8:24 PM IST

गोपीचंद पडळकर
गोपीचंद पडळकर

सांगली -राज्य सरकारला बैलगाडी शर्यतीला परवानगी देता आली असती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीला आता परवानगी दिली आहे. राज्य सरकारने 8 दिवसात बैलगाडी शर्यती प्रकरणातील गुन्हे मागे घ्यावेत,असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर ( MLA Gopichand Padalkar on Bullock cart race ) यांनी केले आहे. सांगलीच्या झरे येथे बैलगाडी मालकांच्यावतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान ते बोलत होते.

बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्याच्या मागणीसाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राज्यभर मोठे आंदोलन ( Farmers agitation for Bullock cart race permission ) उभारले होते. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांचा शेतकरी, बैलगाडी चालक-मालक यांच्यावतीने जाहीर सत्कार ( Procession of Gopichand Padalkar in Sangli district ) करण्यात आला. आटपाडीच्या झरे या ठिकाणी जंगी अशी बैलगाड्यांची मिरवणूकही काढण्यात आली. यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर सहभागी झाले होते.

न्यायालयाच्या या निर्णयामुळे आम्ही खूप आनंदी

हेही वाचा-Bullock Cart Race Maharashtra : अखेर बैलगाडा शर्यतींचा 'धुरळा' उडणार, क्रीडा मंत्र्यांनी केले निर्यणाचे स्वागत

आता 8 दिवसात गुन्हे मागे घ्या ..

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत व आभार व्यक्त करतो. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आम्ही खूप आनंदी झालो आहोत. गावा-गावात बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळाल्यानंतर एक चैतन्य निर्माण झाले आहे. गावगाड्यातील शेतकऱ्याला आणि सर्वसामान्याला न्याय मिळाला आहे. वास्तविक राज्य सरकारने या बैलगाडी शर्यतीला परवानगी द्यायला हवी होती, मात्र आता सर्वोच्च न्यायालयातून शर्यतीला परवानगी मिळाली आहे. राज्य सरकारने 2 महिन्यापूर्वी झालेल्या बैठकीत आठ दिवसात शेतकऱ्यांच्या आणि बैलगाडी चालकांच्यावर असणाऱ्या शर्यतीचे गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते अद्यापही घेतले नाहीत. पण आता न्यायालयाने शर्यतीला परवानगी दिली आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात बैलगाडी शर्यत प्रकरणी असणारे गुन्हे मागे घ्यावेत. तरच तुम्हाला शेतकऱ्यांवर बोलण्याचा अधिकार राहिल, असा टोला आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला ( Gopichand Padalkar slammed gov over farmer cases ) लगावला आहे.

हेही वाचा-Bullock Cart Race : बैलगाडा शर्यतीच्या परवानगीसाठी आमच्या सरकारने दिलेला 'तो' अहवाल ठरला महत्त्वाचा - फडणवीस

ढोलताशांच्या गजरावर आमदार गोपीचंद पडळकर थरकले-

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासोबत बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्याचा आनंद साजरा केला आहे. शेकडो शेतकऱ्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचे अभिनंदन करण्यासाठी झरे या गावामध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांच्याकडून आमदार गोपीचंद पडळकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ढोलताशांच्या गजरावर आमदार गोपीचंद पडळकर हे शेतकऱ्यांसोबत थरकले. त्याचबरोबर स्वतः बैलगाडीमध्ये स्वार होऊन आमदार पडळकर यांनी बैलगाडी शर्यतीवरील न्यायालयाने उठवलेल्या बंदीचे ( Farmers celebration after bullock cart race permission ) स्वागत केले आहे.

हेही वाचा-Bullock Cart Race Maharashtra : बैलगाडा शर्यतींचा 'धुरळा' उडणार; सर्वोच्च न्यायालयाची सशर्त परवानगी

Last Updated : Dec 16, 2021, 8:24 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details