सांगली -पदोन्नती आरक्षणाला काँग्रेसकडून करण्यात आलेल्या विरोधावरून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. वसुली सरकारमधील काँग्रेसच्या मंत्र्यांना बहुजनांच्या हितापेक्षा चंद्रपूरच्या दारू विक्रेत्यांचा "मेव्याचा हेवा"जवळचा वाटत असेल, तर महाराष्ट्रातल्या बहुजनांच्याकडून लोकवर्गणीतून तुमच्याकडे "मेवा"जमा करू. मात्र, तुम्ही बहुजनांचे हक्क मंत्रीमंडळात मांडा, असे आवाहन त्यांनी केले आहे. ते आटपाडीच्या झरे याठिकाणी बोलत होते.
बहुजनांचे हक्क मांडा, तुम्हाला "मेवा"लोकवर्गणीतून देऊ, पडळकरांची काँग्रेसवर टीका - गोपीचंद पडळकर यांच्या बद्दल बातमी
बहुजनांचे हक्क मांडा, तुम्हाला "मेवा"लोकवर्गणीतून देऊ, असे गोपीचंद पडळकर म्हणाले. ते आटपाडीच्या झरे याठिकाणी बोलत होते.
'सरकारचा धिक्कार'
मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण दिलेला काँग्रेसकडून विरोध दर्शवण्यात आला आहे. याविरोधावरून पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकार आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, वसुली सरकारमधील मंत्र्यांसाठी बहुजनांच्या हितापेक्षा दारू विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या ‘मेव्या’चा ‘हेवा’ हा जास्तीचा महत्त्वाचा आहे. चंद्रपुरातील दारू सुरू करणाऱ्या या राज्य सरकारचा धिक्कार आणि निषेध असून या राज्य सरकारला जाहीरपणे विचारतो, ‘मेवा’ मिळत नसेल म्हणून तुम्ही बहुजनांचे हक्क मंत्रीमंडळात मांडत नसाल, तर मी माझ्या बहुजन बांधवांकडून लोकवर्गणीने आपल्यासाठी ‘मेवा’ जमा करण्याचे आवाहन करू शकतो. जेणेकरून तुम्ही बहुजनांच्या हक्कासाठी मंत्रीमंडळात आडाल आणि लढाल. पण वसुलीकरिता बहुजनांचे हक्क गहाण ठेवणाऱ्या वसुली सरकारचा मी धिक्कार करतो, अश्या शब्दात पडळकरांनी पदोन्नती आरक्षणवरून काँग्रेसच्या भूमिकावर जोरदार टीका केली आहे.