सांगली - दगा फटका करून सत्तेत आलेल्या आघाडी सरकारकडून महाराष्ट्राची लुट सुरू आहे, अशी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे हे वाघ होते, तुमच्या सारख्यांना शेपटीची उपमा देता येणार नाही, अशी बोचरी टीका शिवसेनेवर त्यांनी केली आहे. आटपाडीच्या झरे येथे दसऱ्याच्या निमित्ताने शुभेच्छा देताना पडळकर यांनी निशाणा साधला आहे.
- फक्त लुटण्याचे काम सुरू आहे -
आमदार पडळकर म्हणाले, माझा महाराष्ट्र खरोखर सोन्यासारखा आहे आणि तुमचे महाविकास आघाडीचे सरकार दगाफटक्याने सत्तेत आल्यापासून, महाराष्ट्राला लुटण्याची एकही संधी आघाडी सरकार सोडत नाही. मागील दोन वर्षात कोकणाला वादळाने दोन वेळा फटका दिला. शेतकऱ्यांची पीक दुष्काळात तर कधी ओल्या दुष्काळात माती मोल झाली. इतकेच नव्हे तर स्वप्नील लोणकर सारखा होतकरू मुलगा आत्महत्या करतो. तसेच महाराष्ट्रात लालपरीची सेवा देणाऱ्या तब्बल २८ कर्मचाऱ्यांना पगारा अभावी आत्महत्या करावी लागते. त्याचबरोबर अनेक बारा बलुतेदारांवर, भटक्यांवर आर्थिक चणचणीमुळे आत्महत्या करण्याची वेळे येते. हे सर्व सुरू असताना तुम्ही फक्त मदतीचे कागदी घोडे नाचवता आणि मुळात खरी मदत कधी पोहचतच नाही, असे ते बोलतांना म्हणाले.
- मलीद्यासाठी तुमच्या एक वाच्यता -