सांगली - ब्रह्मनाळ येथे पुरात वाहून आलेल्या पिशव्यांमध्ये लाखो रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्यांचा ऐवज सापडला आहे. ज्या ठिकाणी बोट उलटून 17 जणांचा मृत्यू झाला होता, त्याच ठिकाणी या पिशव्या सापडल्या आहेत.
सांगलीचा महापूर : ब्रह्मनाळमध्ये सापडल्या सोन्याच्या दागिन्यांच्या पिशव्या - ब्रह्मनाळ येथे सोन्याचे दागिने
ब्रह्मनाळ येथे पुरात वाहून आलेल्या पिशव्यांमध्ये लाखो रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्यांचा ऐवज सापडला आहे. ज्या ठिकाणी बोट उलटून 17 जणांचा मृत्यू झाला होता, त्याच ठिकाणी या पिशव्या सापडल्या आहेत.
ब्रह्मनाळ येथे सापडल्या सोन्याच्या दागिन्यांच्या पिशव्या
या परिसरात अनेक कापडी पिशव्या सापडल्या असून त्यातील तीन पिशव्यांमध्ये सोन्याचे दागिने आढळून आले आहेत. या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून या पिशव्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. दरम्यान, दागिन्यांच्या मुळ मालकाचा शोध पोलीस घेत आहेत.