महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगली : चैनीसाठी आलिशान गाडीतून शेळ्या चोरणारी टोळी गजाआड - goats thefts in luxury car

इस्लामपूर येथील एका टोळीकडून केवळ चैनीसाठी शेळ्या-बोकड चोरण्याचा गटार समोर आला आहे. संपूर्ण पोलिसांनी या बोकड चोरी टोळीचा पर्दाफाश करत पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

goats  thefts in a luxury car, 4 arrested in sangli
चैनीसाठी आलिशान गाडीतून शेळ्या चोरणारी टोळी गजाआड

By

Published : Jun 13, 2021, 2:13 PM IST

सांगली -चैनीसाठी बोकड चोरणाऱ्या एका टोळीला इस्लामपूर पोलिसांनी गजाआड केले आहे. याप्रकरणी 5 जणांना अटक करून त्यांच्याकडून चार बोकड-शेळी आणि एक आलिशान गाडी हस्तगत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या आलिशान गाडीतून या टोळीकडून बोकड-शेळ्या चोरण्याचा उद्योग करण्यात येत होता.

अटक करण्यात आलेला आरोपी

केवळ चैनीसाठी बोकड चोरी -

इस्लामपूर येथील एका टोळीकडून केवळ चैनीसाठी शेळ्या-बोकड चोरण्याचा प्रकार समोर आला आहे. संपूर्ण पोलिसांनी या बोकड चोरी टोळीचा पर्दाफाश करत पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

अटक करण्यात आलेला आरोपी

हेही वाचा -अन् शिवसेना आमदाराने कंत्राटदारालाच बसवलं नाल्यात; कचऱ्याने घातली अंघोळ

आलिशान गाडीतुन सुरू होती चोरी -

मटणाचे दर गगनाला भिडले आहेत. 600 रुपये किलो दराने जवळपास मटणाची विक्री सुरू आहे. त्यामुळे बोकड-शेळ्यांना चांगली मागणी आहे. नेमकी हीच बाब ओळखून, आपली चैनी भागवण्यासाठी या शेळ्या-बोकडांची चोरी करण्याची उद्योग सुरू होता. गेल्या काही दिवसांपासून इस्लामपूर परिसरामधील शेळी आणि बोकड चोरीच्या घटना सुरू होत्या. इस्लामपूर पोलीस करत असलेल्या तपासादरम्यान नरसिंहपूर येथील एका टोळीकडून या शेळी आणि बोकड चोरीचा प्रकार सुरू असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर या टोळीच्या पाच जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी शेळ्या आणि बोकड चोरी केल्याची कबूली दिली.

अटक करण्यात आलेला आरोपी

अटक केलेल्यांची नावे -

  • अजित पांडूरंग सुर्वे (वय 29)
  • अजय रघुनाथ झीमुर (वय 29)
  • अभिषेक कैलास गोतपागर (वय 30)
  • धनंजय आनंदा कांबळे (वय 29)
  • किरण दिपक लोहार (वय 29)
    अटक करण्यात आलेला आरोपी

ABOUT THE AUTHOR

...view details