सांगली- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीचे गणपती मंदिर आजपासून बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. १ एप्रिलपर्यंत मंदिर बंद राहणार आहे. त्यामुळे आजपासून गणपती मंदिरामध्ये भक्तांना प्रवेश बंद झाला आहे. त्यामुळे भाविकांनी मंदिराकडे दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
सांगलीचे गणपती मंदिर आजपासून बंद... हेही वाचा-कोरोनाने देशाचा जीडीपी घसरून ५.३ टक्के होणार - मूडीजचा अंदाज
जिल्ह्यात परदेशातून तब्बल एकशे अठरा प्रवासी परतले आहेत. या सर्वांची योग्य ती तपासणी जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे. यापैकी 2 प्रवाशांनावर आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. तर उर्वरित 116 प्रवाशी होम क्वाॅरंटाईन आहेत. मात्र, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही.
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या सूचनांनुसार जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, खासगी शैक्षणिक वर्ग यांना 31 मार्चपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. त्याचबरोबर गर्दीची ठिकाणे असणारे मॉल्स, चित्रपटगृह, स्विमिंग पूल, छोटे मॉल्स, उद्याने, धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली आहेत.
सांगली नगरीचे आराध्यदैवत असणारे गणपती मंदिर आजपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गणपती पंचायत संस्थांकडून हे मंदिर बंद करण्यात आले आहे. 1 एप्रिलपर्यंत मंदिर बंद राहणार आहे. त्यामुळे भक्तांना गणपतीचे दर्शन घेता येणार नाही.
मंदिराच्या स्थापनेपासून गतवर्षी आलेल्या महापुरात पहिल्यांदा मंदिरात पाणी आल्याने मंदिर बंद झाले होते. त्यानंतर आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्यांदा गणपती मंदिर बंद राहत आहे. तर जिल्ह्यातील आठवडे बाजार, जनावरांचे बाजारसुद्धा रद्द करण्यात आले आहेत. तर कोरोनाच्या भीतीने नागरीक घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत.