महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sangli Crime News : नकली नोटा खपवणारी टोळी गजाआड; तिघांना अटक, साडे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त - Counterfeit Notes Seller

मुलांच्या खेळण्यातील बनावट नोटा घेऊन फसवणूक करणाऱ्यासाठी आलेल्या एका टोळीला मिरज पोलिसांनी ( miraj police ) जेरबंद केले आहे. 60 हजार रोख आणि मनोरंजन नोटासह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करत तिघांना अटक करण्यात आली आहे. महात्मा गांधी चौकी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ( Counterfeit Notes Seller )

Sangli Crime News
नकली नोटा खपवणारी टोळी गजाआड

By

Published : Jun 9, 2022, 2:50 PM IST

सांगली -मुलांच्या खेळण्यातील बनावट नोटा घेऊन फसवणूक करणाऱ्यासाठी आलेल्या एका टोळीला मिरज पोलिसांनी ( miraj police ) जेरबंद केले आहे. 60 हजार रोख आणि मनोरंजन नोटासह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करत तिघांना अटक करण्यात ( Counterfeit Notes Seller ) आली आहे. महात्मा गांधी चौकी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

पोलिसाची प्रतिक्रिया

नकली नोटा खपवणारी टोळी गजाआड - मिरजेतील कृष्णाघाट येथे महात्मा गांधी चौक पोलिसांच्या नाकेबंदी दरम्यान एका गाडी तपासण्यात आली. ज्यामध्ये नोटांनी भरलेली बॅग आढळुन आली. 2 हजार, 500 आणि 100 रुपयांच्या नोटांचे बंडल असल्याचे समोर आले. मात्र नोटांची तपासणी करण्यात आली असता प्रत्येक नोटांच्या वर आणि खाली खऱ्या नोटा आणि आतील बाजूस लहान मुलांच्या खेळण्यासाठी असणाऱ्या "भारतीय बच्चे बँक"च्या हुबेहूब खऱ्या नोटांप्रमाणे दिसणारया नोटा होत्या. ज्यामध्ये 500 रुपयांच्या 55 बंडल आणि 2 हजार व 100 रुपयांच्या 45 मनोरंजन नोटांच्या बंडलांचा समावेश होता. याप्रकरणी पोलिसांनी उस्मान खुदबुद्दीन एकसंबेकर, सोमवार पेठ कागल, नदीम नालबंद, राहणार नदिवेस नाका इचलकरंजी, आणि शब्बीर साहेब हुसेन पीरजादे, राहणार मिरज या तिघांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. यावेळी खोट्या नोटा देऊन, खऱ्या नोटा घेऊन फसवणूक करण्यासाठी मिरजेत आल्याचे सांगितले.

नकली नोटा

तीन लाखांचा मुद्देमाल - दरम्यान पोलिसांनी तिघांना अटक करत त्यांच्याकडेल रोख 60 हजार रोख, चारचाकी गाडी आणि भारतीय बच्चे बँकेच्या नोटा असा साडे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हेही वाचा -निवडणुकीला काही तासांचा अवधी; ट्रायडंटमध्ये आदित्य ठाकरे, संजय राऊत ठोकणार तळ

ABOUT THE AUTHOR

...view details