सांगली - भव्य-दिव्य विसर्जन मिरवणुकीची परंपरा असणार्या मिरजेच्या ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. मोठ्या उत्साहात लाडक्या बाप्पांना निरोप देण्यासाठी पुढच्या वर्षी लवकर या ,अशा गजरात मिरवणुका सुरू झाल्या आहेत. यावेळी दोनशेहून अधिक गणेश मंडळांच्या गणेश मुर्तींचे विसर्जन होणार आहे.
हेही वाचा -'दंगल गर्ल'ने दिला पोलीस उपनिरीक्षकपदाचा राजीनामा, भाजपकडून निवडणूक लढवणार?
सांगलीच्या मिरजेत भव्य-दिव्य विसर्जन मिरवणुका काढून लाडक्या बाप्पांना निरोप देण्याची परंपरा आहे. यावर्षीही अमाप उत्साहात मिरवणुकींना आता सुरुवात झाली आहे. मिरज शहरातील दोनशेहून अधिक गणेश मंडळांच्या मुर्तींचे विसर्जन होणार आहे. दरवर्षी या ठिकाणी या मिरजेत दोन दिवस बाप्पांच्या विसर्जन मिरवणुका सुरू राहतात, त्याचबरोबर या ठिकाणी गणरायांना निरोप देण्यासाठी भव्य-दिव्य स्वागत कमानी उभारण्याची देखील परंपरा आहे. 100 फुटापर्यंत पौराणिक, सामाजिक संदेश देण्याची स्वागत कमानी उभारण्याची परंपरा आहे. मात्र, यंदा महापुराच्या पार्श्वभूमीवर त्या उभारल्या गेलेल्या नाहीत. पण मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या आहेत. दरम्यान, ढोल-ताशांच्या गजरात, बाँजो-झांजच्या निनादात मिरवणुकींना सुरुवात झाली आहे.
मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीचा उत्साह हेही वाचा -जम्मू-काश्मीरबाबत नेहरूंचा दृष्टिकोन चुकीचा; सरदार पटेलांचा दृष्टिकोन योग्य - रविशंकर प्रसाद
गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.1300 हून अधिक पोलीस कर्मचारी, अधिकारी तैनात करण्यात आले आहेत, त्याच बरोबर मिरवणूक मार्गावर 67 सीसीटीव्ही कॅमेरेही सज्ज करण्यात आले आहेत. मिरजेतील गणेश तलावात 13 फुटांच्या आतील, तर त्या पेक्षा उंच गणेश मूर्तींचे विसर्जन यंदा सांगलीच्या कृष्णा नदीत करण्यात येणार असून याठिकाणी पालिका प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आले आहे.