सांगली- आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी येथील मिरज नगरीत गणेशभक्तांचा महापूर उसळला होता. मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या,अश्या जयघोषात आणि ढोल-ताश्या, झांज, लेझीमच्या निनादात ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुका सुरू होत्या.
लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मिरजेत भक्तांचा महापूर - miraj news
मिरजेत गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे. या वर्षी महापुराची सावट असली तरीही मोठ्या जल्लोषात गणेश विसर्जन मिरवणुका पार पडल्या. अनंत चतुर्थी दिवशी भव्य-दिव्य गणेश विसर्जन मिरवणुकीची परंपरा आहे. यंदाच्या वर्षीही आपल्या लाडक्या गणरायाला मोठ्या भक्ती भावाने निरोप देण्यात आला.
लाडक्या बाप्पांना निरोप देण्यासाठी मिरज नगरीत भक्तांचा महापूर
मात्र तरीही गणेश भक्तांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अश्या जयघोषाने अवघी मिरज नगरी दुमदुमून निघाली होती. शहरातील मिरवणूक मार्गावर अनेक सामाजिक संघटना, राजकीय पक्षांच्या वतीने गणेश मंडळांचे स्वागत करण्यात येत होते. पहाटे पर्यंत मिरज नगरीत विसर्जन सोहळा पार पडतो. आणि ही ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी सांगली जिल्ह्यासह कर्नाटकमधून मोठ्या संख्येने भाविक उपस्थिती लावतात.