सांगली- महापुराने थैमान घातल्यामुळे यंदा सांगलीच्या गणेशोत्सवावर परिणाम झाला आहे. अवघा एक दिवस उरला असताना गणेशोत्सवाचा उत्साह गणरायाच्या सांगली नगरीत बघायला मिळत नाही. गणेश चतुर्थीच्या आधी गर्दी होणाऱ्या बाजारपेठ आणि स्टॉलवर तुरळक प्रमाणात गणेशभक्तांची गर्दी दिसून येत आहे.
सांगलीच्या गणेशोत्सवावर महापुराचा परिणाम - ganesh festival in sangli
सर्वत्र गणेशोत्सवाचे वातावरण असल्याने सांगलीत मात्र महापुरामुळे प्रचंड नुकसान झाल्याने दरवर्षी बघायला मिळणारा गणेशोत्सवाचा उत्साह यावर्षी मावळला आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ त्याचबरोबर पुष्पराज चौक या ठिकाणी असणाऱ्या गणेश स्टॉलवर गणेश चतुर्थीच्या पुर्वार्धात ज्या प्रमाणात गर्दी होते ती न होता तुरळक प्रमाणात या ठिकाणी गणेश मुर्ती खरेदी करण्यासाठी भाविक येत आहेत.
कृष्णा आणि वारणा नद्यांना आलेल्या महापुराचा फटका सर्व पातळ्यांवर बसला आहे. यंदाच्या गणेशोत्सवावरही या महापुराचे सावट मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. गणेश मुर्तीकारांसह व्यावसायिकांवरही या महापुराचा परिणाम झाल्याचे जाणवत आहे. अनेक गणेश मंडळांनी साध्या पद्धतीने गणेश उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही गणेश मंडळांनी केवळ मुर्तीची प्रतिष्ठापना करून गणेश उत्सव साजरा करण्याची भूमिका घेतली आहे. घरगुती गणपतीवरही महापुराचा परिणाम झाला आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ त्याचबरोबर पुष्पराज चौक या ठिकाणी असणाऱ्या गणेश स्टॉलवर गणेश चतुर्थीच्या पुर्वार्धात ज्या प्रमाणात गर्दी होते ती न होता तुरळक प्रमाणात या ठिकाणी गणेश मुर्ती खरेदी करण्यासाठी भाविक येत आहेत.
हेही वाचा- पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी सरकारला भाग पाडू, प्रसंगी टोकाचा संघर्ष करू - राजू शेट्टी