महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आता भय मगरींचे... कृष्णाकाठी पुरानंतर मगरींचा मुक्त वावर - कृष्णा नदी

कृष्णा काठचा महापूर ओसरू लागला असली तरी कृष्णाकाठी नवी भिती निर्माण झाली आहे. ती म्हणजे कृष्णा नदी पात्रातील मगरींचा अनेक ठिकाणी सुरू असलेले मुक्त वावर आणि दर्शनाची. महापुरामुळे पात्रातल्या मगरी नागरी वस्तीत पाहायला मिळत आहेत. त्यामुळे कृष्णाकाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मगरींचा मुक्त वावर
मगरींचा मुक्त वावर

By

Published : Jul 27, 2021, 4:04 PM IST

सांगली - कृष्णा काठचा महापूर ओसरू लागला असली तरी कृष्णाकाठी नवी भिती निर्माण झाली आहे. ती म्हणजे कृष्णा नदी पात्रातील मगरींचा अनेक ठिकाणी सुरू असलेले मुक्त वावर आणि दर्शनाची. महापुरामुळे पात्रातल्या मगरी नागरी वस्तीत पाहायला मिळत आहेत. त्यामुळे कृष्णाकाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कृष्णाकाठी पुरानंतर मगरींचा मुक्त वावर

कृष्णेच्या पात्रात मगरींचे वास्तव्य -

सांगलीच्या कृष्णा नदी पात्रात मगरींचे मोठे वास्तव आहे. औदुंबरच्या डोहापासून हरिपूरपर्यंत मगरींचा वावर आहे. ब्रिटिश काळापासून कृष्णेच्या पात्रात मगरींचा वावर असल्याचे सांगलीच्या गॅझेटमध्ये देखील नमूद आहे. जस-जसा काळ वाढत गेला तसे कृष्णेच्या या पात्रातील मगरींची संख्याही वाढत गेली. वनविभागाच्या आकडेवारीनुसार सुमारे 50 हुन अधिक मगरी कृष्णेच्या पात्रात वास्तव्यास आहेत. मात्र यामध्ये वाढ झाली आहे.

मगरींचा मुक्त वावर

पुराबरोबर मगरींचे दर्शन -

कृष्णा नदीला महापूर आला. त्यानंतर पात्रातील मगरी नागरी वस्तीत शिरताना पाहायला मिळतात. त्यामुळे या महापुरात अनेक ठिकाणी मगरींचे दर्शन होऊ लागले आहे. नुकतेच वाळवा तालुक्यात लक्ष्मी मंदिर या ठिकाणी अजस्त्र अश्या एका मगरीचे दर्शन झालं होतं. मुक्तपणे या मगरीचा वावर रस्त्यावर पाहायला मिळाला होता. तर चसांगली नजीकच्या कर्नाळ गावानजीक महापुराच्या पाण्यात नागरी वस्तीमध्ये अशाच एका मगरीचे दर्शन झालं होतं. अजस्त्र अशीही मगर याठिकाणी पुराच्या पाण्यात वावरताना दिसून आली होती.

घराच्या छतावर आणि अंगणातही मगर -

आता कृष्णाकाठी आणखी दोन अजस्त्र मगरींचे दर्शन झाले आहे. नदीकाठावर असणाऱ्या एका घराच्या अंगणात अजस्त्र अशी मगर दिसून आली आहे. या मगरीचा मुक्त वावर या ठिकाणी सुरू होता. तसेच याच कृष्णा नदीच्या पात्रात मदतकार्य दरम्यान एका बुडालेल्या घराच्या मगरीने आसरा घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. सुमारे आठ ते दहा फूट असणारी ही मगर कौलारू छतावर बसून होते. कृष्णा नदीचा महापूर आता ओसरू लागल्याने, कृष्णाकाठी आता ठिक-ठिकाणी मगरींचा मुक्त वावर आणि दर्शन होत आहे. अजस्त्र असणाऱ्या या मगरींच्यामुळे आता कृष्णाकाठी पुन्हा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details