सांगली :पाय घसरून विहिरीत पडल्याने एका 14 वर्षीय मुलीचा बुडून दुर्दैवीमृत्यू झाला (girl went to fetch water died after fell in well) आहे. जत तालुक्यातल्या उमदी नजीक असणाऱ्या बेळोडंगीमध्ये ही घटना घडली आहे.धानम्मा रेवापा चौगुले, असे या मुलीचे नाव आहे. पाणी आणण्यासाठी गेली असता हा प्रकार घडला (Girl Died in Sangali) आहे.
Girl Died : पाणी आणण्यासाठी गेलेल्या चौदा वर्षीय मुलीचा पाय घसरून विहिरीमध्ये मृत्यू - died after fell in well in sangali
पाय घसरून विहिरीत पडल्याने एका 14 वर्षीय मुलीचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला (girl went to fetch water died after fell in well) आहे. पाणी आणण्यासाठी गेली असता हा प्रकार घडला (Girl Died in Sangali) आहे.
पाण्यात बुडून मृत्यू :जत तालुक्यातील उमदी नजीक असणाऱ्या बेळोडंगी येथील चौगुले वस्तीमध्ये राहणारी धानम्मा रेवापा चौगुले, वय 14 ही मुलगी घरातील पाणी संपल्याने, पाणी आणण्यासाठी घराशेजारी असणाऱ्या विहीरीवर गेली होती. यावेळी विहीरीत उतरताना धानम्मा हिचा पाय घसरला आणि ती खोल विहिरीमध्ये पडली. ज्यामध्ये तिचा पाण्यात बुडून मृत्यू (girl went to fetch water) झाला.
रेस्क्यू टीम शोध :पाणी आणण्यासाठी धानम्मा गेली. मात्र ती परत न आल्याने घरच्यांनी शोध सुरू केले. विहिरीमध्ये घागर आढळून आली. त्यानंतर सदर घटनेची माहिती उमदी पोलिसांना देण्यात आल्यानंतर रेस्क्यू टीम आणि पोलिस व ग्रामस्थांनी मिळून विहिरीमध्ये शोध सुरू केला आणि अथक प्रयत्नानंतर धानम्मा हिचा मृतदेह आढळून आला. यानंतर धानम्मा हिच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला होता. तर या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत (died after fell in well in sangali) आहे.