सांगली- जत तालुक्यातील माडग्याळपासून दोन किमी अंतरावर एका चारचाकीचा अपघात झाला. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्यापासून पन्नास फूट अंतरावर असणाऱ्या विहिरीत जाऊन कोसळली. मात्र, कोणतीही जीवितहानी झाली नाही. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.
जतमधील माडग्याळजवळ चारचाकी विहिरीत कोसळली, जीवितहानी नाही - sangli car accidnet
जत तालुक्यातील माडग्याळपासून दोन किमी अंतरावर एका चारचाकीचा अपघात झाला. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्यापासून पन्नास फूट अंतरावर असणाऱ्या विहिरीत जाऊन कोसळली. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
प्रत्यक्ष घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की ही चारचाकी जत तालुक्यातील बिळूर येथील होती. पिरगोंडा बाबू माळी हे आपल्या मुलासोबत माडग्याळ येथे असणाऱ्या पाहुण्यांच्या घरी जात होते. यावेळी वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या 20 फूट खोल पडिक विहिरीत कोसळले.
विहिर खोल नसल्याने तसेच त्यात पाणी नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातात पिरगोंडा बाबू माळी (वय 45), लक्ष्मण सत्याप्पा माळी (वय 60), आणि ज्ञानेश्वर पिरगोंडा माळी (वय 5) हे किरकोळ जखमी झाले आहेत. पुढील उपचारासाठी त्यांना जत येथे पाठवण्यात आले आहे.