सांगली -जिल्ह्यात कोरोनाचे आणखी ४ कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. शिराळा, वाळवा, कवठेमहांकाळ आणि आटपाडी तालुक्यातील हे चार व्यक्ती आहेत. यामधील ३ जण मुंबईवरून आले होते, तर एक जण मुंबईहूनन आलेल्या कोरोनाबाधिताच्या संपर्कातील आहे. सर्वांवर मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचार सुरू असून, तर एक कोरोनाबाधित व्यक्ती कोरोना मुक्त झाल्याने सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा ३२ झाला आहे. जिल्हा कोरोना नोडल अधिकारी डॉ. संजय साळुंखे यांनी ही माहिती दिली.
सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रविवारी आणखी चार व्यक्तींना कोरोना लागण झाल्याचे समोर आले आहे. वाळवा तालुक्यातील आष्टा येथील झोळंबी येथील एका तरुणाला कोरोना लागण झाली आहे. १६ मे रोजी मुंबईच्या विक्रोळी येथून आष्टा येथे आला होता. झोळंबी येथील एका शाळेत कम्युनिटी क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात आले होते. तर कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथील मुंबई वरून आलेल्या ४८ वर्षीय एका व्यक्तीला कोरोनाला लागण झाली आहे. २१ मे रोजी तो व्यक्ती हा मुंबई वरून आल्यानंतर त्या व्यक्तीला थेट मिरज कोरोना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तर सध्या या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे.