महाराष्ट्र

maharashtra

मुंबईहून आलेल्या चौघांना कोरोनाची लागण, आठ वर्षांच्या मुलीचा समावेश; आकडा ४३ वर

By

Published : May 27, 2020, 3:35 PM IST

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. बुधवारी सकाळी आणखी चार नवे रुग्ण आढळून आले आहेत. हे चारही जण मुंबईहून आले आहेत. या सर्वांना वेगवेगळ्या ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आले होते. आता जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४३ झाली आहे.

Sangli corona news
सांगली कोरोना न्यूज

सांगली - जिल्ह्यात कोरोनाचे आणखी ४ नवे रुग्ण आढळले आहेत. मुंबईहून आलेल्या चौघांना कोरोना लागण झाली आहे. शिराळा, कडेगाव, खानापूर आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील चार जणांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४३ वर पोहोचल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. बुधवारी सकाळी आणखी चार नवे रुग्ण आढळून आले आहेत. हे चारही जण मुंबईहून आले आहेत. या सर्वांना वेगवेगळ्या ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आले होते. आता जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४३ झाली आहे.

खानापूर तालुक्यातील सुलतानगादे येथील ५७ वर्षीय महिला २२ मे रोजी मुंबईहून आली होती. तर, शिराळा तालुक्यातील करंगुली येथील ३३ वर्षीय तरुण १७ मे रोजी मुंबईहून आला होता. तर, कडेगाव तालुक्यातील आंबेगाव येथील ३६ वर्षीय पुरुष दिनांक २४ मे रोजी मुंबईहून आला होता. तर, लांडगेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील आठ वर्षीय मुलगी दिनांक २३ मे रोजी मुंबईहून आल्याने तिला कम्युनिटी क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. तिलाही कोरोणाची लागण झाली आहे. या सर्वांवर मिरज सिव्हिल रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details