सांगली - बंदोबस्तावर असणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह एक वृद्ध महिला आणि एका व्यक्तीवर पिसाळलेल्या श्वानाने हल्ला करत, चावा घेतल्याची घटना विटा शहरात घडली आहे. या हल्ल्यात 2 पोलिसांहस चार जण जखमी झाले आहेत.
पिसाळलेल्या श्वानाच्या हल्ल्यात दोन पोलिसांसह चौघे जखमी - सांगली जिल्हा लेटेस्ट न्यूज
बंदोबस्तावर असणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह एक वृद्ध महिला आणि एका व्यक्तीवर पिसाळलेल्या श्वानाने हल्ला करत, चावा घेतल्याची घटना विटा शहरात घडली आहे. या हल्ल्यात 2 पोलिसांहस चार जण जखमी झाले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या विटा शहरात कडक लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान शहरातील शिवाजी चौकात कर्तव्यावर असणारे पोलीस कर्मचारी सुनील सुर्यवंशी यांच्यावर अचानक पिसाळलेल्या श्वानाने हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत. त्यानंतर थोडे पुढे गेल्यानंतर या श्वानाने आणखी एक पोलीस कर्मचारी अर्जुन बोडके यांना देखील चावा घेतला आहे. याचबरोबर या श्वानाने याच परिसरामध्ये एक वृद्ध महिला आणि पुरुषाला देखील चावा घेतला. या घटनेमुळे विटा शहरात भीतीचे वातावरण पसरले असून, तातडीने या श्वानाचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
हेही वाचा -भारताची स्टार खेळाडू प्रिया पूनियाच्या आईचे कोरोनामुळे निधन